Advertisement

पॉर्न पाहणार्‍यामध्ये भारतीयांचा क्रमांक अव्वल


पॉर्न पाहणार्‍यामध्ये भारतीयांचा क्रमांक अव्वल
SHARES
देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवासांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. 14 एप्रिलपर्यंत सुरु राहणार्‍या या लॉकडाउनदरम्यान भारतीय मोठय़ा प्रमाणात पॉर्न कंटेंट पाहत असल्याची माहिती पॉर्नहब या वेबसाइटने जारी केलेल्या अहवालामधून समोर आली आहे. पॉर्नहबने जारी केलेल्या अहवालामध्ये लॉकडाउन सुरू झाल्यापासून पॉर्न पाहणार्‍या भारतीयांची संख्या वाढल्याचे निरिक्षण नोंदवले आहे.

जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असल्याने अनेक देशामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. याच पार्श्‍वभूमीवर पॉर्नहबने त्यांच्या वेबसाईटवरील प्रिमियम कंटेंट जगभरातील सर्व देशांमध्ये एका महिन्यासाठी मोफत उपलब्ध करून देत असल्याची घोषणा केली होती. कंपनीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये 50 हजार मास्क वाटप करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी कोरोनाचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या इटलीमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर तेथील युझर्ससाठी मोफत प्रिमियम सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव युरोपसहीत जगभरातील इतर देशामध्येही वाढल्यावर कंपनीने जगभरामध्ये प्रिमियम सेवा महिन्याभरासाठी मोफत देत असल्याची घोषणा केली. यामुळे साईटवर येणार्‍या युझर्सच्या संख्येत वाढ झाली आहे.

25 मार्च रोजी कंपनीने जगभरामध्ये मोफत सेवा देत असल्याची घोषणा केली. ही घोषणा झाली त्या दिवशीच वेबसाईटवर येणार्‍या भारतीयांच्या संख्येमध्ये 55.4 टक्क्यांनी वाढ झाल्याचे मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. या घोषणेच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच 26 मार्च रोजी वेबसाईटवर येणार्‍या भारतीयांची संख्या चक्क 86.4 टक्क्यांनी वाढल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. तिसर्‍या दिवशी म्हणजेच 27 मार्च रोजी बेवसाईटवरील भारतीयांची संख्या 24 एप्रिलच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट झाल्याचे पहायला मिळाले. 27 मार्च रोजी साईटवरील प्रिमियम कंटेंट पाहणार्‍या भारतीयांची संख्या 95.3 टक्क्यांनी वाढल्याचे पाहयला मिळाले. एक मार्च रोजी वेबसाईटवर केवळ 0.8 टक्के युझर्स हे भारतीय होते, असे आकडेवारी पहिल्यास दिसून येते.

इटलीबरोबरच फ्रान्स आणि स्पेनमध्येही कंपनीने सर्वात आधी मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जास्तीत जास्त लोकांनी घरातच थांबावे आणि कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू नये या हेतूने साईटवरील कंटेंट कंपनीने मोफत उपलब्ध करून देत असल्याचे पत्रक जारी करण्यात आले होते.
आश्‍चर्याची बाब म्हणजे कंपनीने जारी केलेल्या अहवालामध्ये लोक वेबसाईटवर कोरोना किंवा कोवीड या नावाने पॉर्न सर्च करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. देशामध्ये पॉर्नहब आणि इतर पॉर्न वेबसाईटवर बंदी घालण्यात आली आहे. 

2018 मध्ये उत्तराखंड उच्च न्यायलयाने देशामध्ये 827 पॉर्न वेबसाईटवर बंदी घालण्याचे आदेश सरकारला दिले होते. या आदेशानुसार सरकारने 27 ऑक्टोबर 2018 रोजी मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा पुरवणार्‍या कंपन्यांना 827 साईटवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून देशामध्ये या साईटवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे असले तरी देशामध्ये व्हिपीएनद्वारे (व्हचरुअल प्रायवेट नेटवर्क) पॉर्न वेबसाइट्स पाहणार्‍यांचे प्रमाणात तब्बल 400 टक्क्यांनी वाढ झाल्याचे डिसेंबर 20@9 मध्ये समोर आले होते
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा