Advertisement

प्रिन्सेस डॉक इथं मरीना प्रकल्प उभारण्यात येणार

मुंबईची पूर्व किनारपपट्टी लवकरच विकसित करण्यात येणार आहे.

प्रिन्सेस डॉक इथं मरीना प्रकल्प उभारण्यात येणार
SHARES

मुंबईची पूर्व किनारपपट्टी लवकरच विकसित करण्यात येणार आहे. या किनारपट्टीच्या विकासासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे प्रस्तावित करण्यात आलेल्या मरीना प्रकल्प व कान्होजी आंग्रे बेटाला पर्यटन स्थळ बनवण्याच्या प्रकल्पाला केंद्र सरकारनं मंजूरी दिली आहे. त्यामुळं आता या दोन्ही प्रकल्पांच्या कामाला वेग येणार आहे. केंद्र सरकारच्या अर्थ विषयक स्थायी समितीची तत्वत: मंजूरी मिळाल्यानं या प्रकल्पाबाबत निविदा प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून, पुढील ६ महिन्यात ही प्रक्रिया वेगानं करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

मरीना प्रकल्प

प्रिन्सेस डॉक इथं ३६० कोटी खर्चून ३०० यॉटस क्षमतेचा मरीना प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये २०० छोटी जहाजे व १०० जहाजांची दुरुस्ती क्षमता असलेले केंद्र तयार करण्यात येणार आहे. मरीना प्रकल्पाला रस्त्याशी जोडण्यात येणार आहे, परिणामी तिथं जावून नागरिकांना बोट भाड्यानं घेऊन पर्यटन करता येणं शक्य होणार आहे. सध्या केरळ मधील कोची आंतरराष्ट्रीय मरीना प्रकल्प हा कार्यरत असलेला देशातील एकमेव मरीना प्रकल्प आहे.

दुसरा मरीना प्रकल्प

२०२२ मध्ये हे काम पूर्ण होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील प्रिन्सेस डॉक येथील सुमारे १२ एकर जागेवर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यामध्ये जहाज थांबवण्यसाठी जागा उपलब्ध करण्यासोबत नागरिकांच्या सोयीसाठी हॉटेल, क्लब, अ‍ॅम्फीथिएटर, अशा विविध सुविधा पुरवण्यात येणार आहेत. मुंबईत उभारण्यात येणारा हा प्रकल्प देशातील हा दुसरा मरीना प्रकल्प ठरणार आहे. यामुळे पर्यटन वृृध्दीसह रोजगाराच्या संधीत देखील वाढ होणार आहे.



हेही वाचा -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किल्ले शिवनेरीवर जाणार

विराट कोहलीच्या नावे 'या' नव्या विक्रमाची नोंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा