विराट कोहलीच्या नावे 'या' नव्या विक्रमाची नोंद

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

SHARE

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. विराटनं ३ सामन्यांच्या मालिकेत आश्वासक कामगिरी केल्यानं त्याला या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या तिसऱ्या व अंतिम टी-२० सामन्यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारतानं २४० धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळं टीम इंडियानं ६७ धावांनी सामना जिंकत मालिकेत २-१ ने बाजी मारली.

'मालिकावीर'चा षटकार

विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये 'मालिकावीर' चा षटकार मारला आहे. मालिकावीराचा किताब जिंकण्याची विराटची ही सहावी वेळ ठरली आहे. या यादीत एकही खेळाडू सध्या विराटच्या जवळपास देखील नाही आहे. विराटच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याचा नंबर येत असून त्याच्या नावे ३ मालिकावीर पुरस्कार आहेत.

२४० धावांचा पाठलाग

या सामन्यात २४० धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाची सुरुवात खराब झाली होती. अवघ्या १७ धावांत वेस्ट इंडिजचे ३ फलंदाज माघारी परतले. त्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि कायरन पोलार्ड यांनी फटकेबाजी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. हे फलंदाज संघाचा डाव सावरणार असं वाटत असतानाच, कुलदीप यादवनं हेटमायरचा अडसर दूर केला. त्यानंतर कायरन पोलार्डनं आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत पोलार्डनं उत्तुंग षटकार ठोकलं. मात्र, ६८ धावांवर पोलार्ड माघारी परतल्यानंतर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी हार मानली.हेही वाचा -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किल्ले शिवनेरीवर जाणार

मध्य रेल्वेच्या लोकल फेऱ्यांच्या वेळेत बदलसंबंधित विषय
ताज्या बातम्या