Advertisement

'अर्थसंकल्पाचे फायदे तितके तोटे'


SHARES

मुंबई - अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये कृषी, छोटे उद्योग, पर्यटन या उद्योगांना चालना देणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाचं उद्योगपती आणि अर्थतज्ञ्ज्ञांनी स्वागत केलं आहे. सर्वसमावेश अर्थसंकल्प असून सर्वांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असं कोटक कंपनीचे संचालक सुरेश कोटक यांनी स्पष्ट केलं.

अरुण जेटली यांनी सर्वसामान्यांना दिलासा देत 3 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केलं. 2.5 ते 5 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना 5 टक्के प्राप्तिकर भरावा लागणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कॉर्पोरेट सेक्टरसाठी काहीतरी भरीव घोषणा होईल अशी आशा होती. पण, याबाबत घोषणा न झाल्याने अर्थतज्ज्ञ जी. चंद्रशेखर यांनी निराशा व्यक्त केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा