अपोलो हॉस्पिटलच्या विशेष परिषदेचे अंधेरीत आयोजन

Andheri
अपोलो हॉस्पिटलच्या विशेष परिषदेचे अंधेरीत आयोजन
अपोलो हॉस्पिटलच्या विशेष परिषदेचे अंधेरीत आयोजन
See all
मुंबई  -  

फास्टफूडच्या या दुनियेत योग्य आहार घेऊन पुरेसे व्यायाम केल्यास आरोग्य उत्तम ठेवता येईल, असा सल्ला अपोलो हॉस्पिटल समुहाच्या क्लिनिकल न्यूट्रिशन आणि डाएटिक्स यांनी दिला. अपोलो हॉस्पिटलच्या नवव्या अपोलो 'इंटरनॅशनल क्लिनिकल न्यूट्रिशन अपडेट (एआयसीएनयू) परिषद 2017' चे आयोजन अंधेरीच्या ललित हॉटेलच्या सभागृहात शनिवारी करण्यात आले. यात दहा देशातील एकूण 550 प्रतिनिधी सहभागी झाले होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत जगभरातील वैद्यकीय पोषणतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांनी सहभाग घेतला होता. यंदाच्या या परिषदेची संकल्पना 'कनेक्टिंग एव्हीडन्स टू क्लिनिकल न्यूट्रिशन प्रॅक्टिस' अशी होती. यात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी उपस्थितांना उत्तम आहार आणि निरोगी जीवनशैली कशी जगता येईल यावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर या परिषदेत वादविवाद, लेक्चर्स, सिम्पोसिया, अॅबस्ट्रॅक्ट, सेशन्स, चर्चासत्रे आदींचे सादरीकरण करण्यात आले. यातून आतड्यांचे कामकाज बंद पडणे, सर्जिकल अकोलॉजी, इम्युनो न्यूट्रिशन आणि क्लिनिकल न्यूट्रिशन रिसर्च आशा गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले होते. एआयसीएनयूच्या विज्ञान समितीकडे परिषदेत सादर करण्यासाठी 75 संशोधन अॅबस्ट्रॅक्ट्स आलेे होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.