Advertisement

मुंबईत पहिल्यांदाच पिकलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा शुभारंभ


मुंबईत पहिल्यांदाच पिकलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा शुभारंभ
SHARES

मुंबईत येत्या शनिवार आणि रविवारी आंतरराष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धा खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा जुहू येथील जमनाबाई नरसी स्कूल येथे रंगणार येणार आहे. या स्पर्धेत भारतासह जगभरातले खेळाडू सहभागी होणार आहे. या नवीन प्रकारच्या खेळासाठी मुंबईत आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवण्यात आल्यामुळे लोकांमध्ये देखील याची ओढ जोमात आहे. आंतरराष्ट्रीय ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

या स्पर्धेत थायलंड, युके आणि भारतातील काही राज्यातून खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत तीन प्रकारच्या फेऱ्या असणार आहेत. पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकारात ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक कॅटेगरीमध्ये 16 संघ असतील. ही स्पर्धा नॉक आऊट लीग या फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला पारितोषिक म्हणून सुवर्ण पदक आणि चषक देण्यात येईल.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुंबईचे एकूण 15 ते 20 खेळाडू सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रमधील जळगाव, औरंगाबाद या जिल्ह्यातून देखील खेळाडू सहभागी होणार आहेत.

हा खेळ खूप वेगळा आहे. यात वयाची अट नाही आहे. कोणताही खेळामुळे तुम्ही फिट राहता. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आम्ही आयोजित केली आहे आणि दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करू.
- सुनील वालावलकर, जनरल सेक्रेटरी, ऑल इंडिया पिकलबॉल अससोसिएशन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा