Advertisement

मुंबईत आंतरराष्ट्रीय स्टेडियम येणार! शिवसेनेचा संकल्प

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सादर केलेल्या सन २०१८-१९च्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने आपल्या योजना जोडत सुधारीत अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. यामध्ये महापालिकेच्या क्रिकेट व फुटबॉल अकॅडेमी स्थापन करण्याबरोबरच मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्याचा संकल्प केला आहे.

मुंबईत आंतरराष्ट्रीय स्टेडियम येणार! शिवसेनेचा संकल्प
SHARES

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सादर केलेल्या सन २०१८-१९च्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने आपल्या योजना जोडत सुधारीत अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. यामध्ये महापालिकेच्या क्रिकेट व फुटबॉल अकॅडेमी स्थापन करण्याबरोबरच मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्याचा संकल्प केला आहे. शिवाजीपार्क येथे समुद्रात अस्थी विसर्जन करण्यासाठी रस्ता बनवणे, मुंबईत भव्य नाट्यसंग्रहालय उभारणे या कामांसाठी ठोस तरतूदही करण्यात आली आहे.


स्थायी समितीच्या ५५० कोटींच्य सुधारणा

आयुक्त अजोय मेहता यांनी सन २०१८-१९चा २७ हजार २७८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांना सादर केला. त्यानंतर याच रकमेमध्ये ५५० कोटी रुपयांच्या सुधारीत विकासकामांचा अंतर्भाव करत स्थायी समितीने अर्थसंकल्पाला मान्यता दिली. स्थायीच्या मान्यतेनंतर अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी शनिवारी हा अर्थसंकल्प सभागृहाला सादर केला.


भाजपला ११६ तर शिवसेनेच्या वाट्याला १५० कोटी

सुधारीत ५५० कोटी रुपयांमध्ये २१० कोटी रुपये नगरसेवकांना प्रत्येकी १ कोटी रुपयांच्या विकास निधीसाठी तर उर्वरीत रक्कम विविध पक्षांच्या गटनेत्यांना वाटण्यात आली आहे. यामध्ये मागील वेळेस ५० कोटी रुपये मिळवणाऱ्या भाजपाला यंदा ११६ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून सत्ताधारी शिवसेनेच्या वाट्याला सुमारे १५० कोटी रुपये आल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेने आपल्या वचननाम्यातील काही कामांचा तसेच मागील वेळेस तरतूद केलेल्या परंतु त्याची अंमलबजावणी होऊ न शकलेल्या विकासकामांचा समावेश करून त्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. तर काही विकासकामांसाठी १ ते १० लाख रुपयांची तरतूद करून त्यांची खाती उघडली आहेत.


स्थायी समितीने सुचवलेली विकासकामे आणि निधी

० मराठी भाषा संवर्धनासाठी पीएचडी करणाऱ्यांना शिष्यवृत्तीसाठी - १ लाख रुपये

० मराठी साहित्य संमेलन व मराठी नाट्य संमेलन - २५ लाख

० मुंबईत भव्य नाट्यसंग्रहालय उभारणे - १० लाख

० एड्सग्रस्त व्यक्तीच्या निधनानंतर विधवा पत्नीला आर्थिक सहाय्य - १०लाख

० निराधार मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य - १० लाख

० महिला बचत गटांसाठी कागदी पिशव्यांची निर्मिती - १० लाख

० एकल महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी - १लाख

० महिलांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी ठोस कार्यक्रम - १ लाख

० बलात्कारासारख्या दुर्देवी घटनांमधून जन्माला येणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी तसेच मातांच्या स्वयंरोजगारासाठी - २५ लाख

० रस्त्यावरील मुलांना शिकवण्यासाठी’ स्कूल ऑन व्हील’ उभारण्यासाठी - १ लाख

० करदात्यांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये परदेशात जाण्यासाठी अर्थसहाय - १० लाख

० नरीमन पॉईंट, गिरगाव चौपाटीदरम्यान वातानुकूलित डिलक्स शौचालय - १० लाख

० अंधेरी पश्चिमच्या शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलात रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवणे - १ लाख

० शहाजी राजे क्रीडा संकुलात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवणे - १ लाख

० क्रांतीवीर लहुजी साळवे यांचे स्मारक - १ लाख

० भागोजी कीर यांच्या स्मारकासाठी - १० लाख

० प्रभादेवी मंदिराला प्रवेशद्वार उभारणे - २५ लाख

० शीव-पनवेल महामार्गावरील मानखुर्द येथे प्रवेशद्वार - १ लाख

० प्रभाग क्रमांक २०९मध्ये महाराणा प्रताप चौक येथे महाराणा प्रताप यांचा पूर्णाकृती पुतळा - ५० लाख

० मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावरील मोकळ्या जमिनीचा हिस्सा महापालिकेसाठी संपादित करून पर्यटन क्षेत्र बनवणे - १० लाख

० दादर - माहिम चौपाटी सुशोभिकरण - १० लाख

० धारावी येथे संत रोहिदास भवन बांधण्यासाठी - १० लाख

० प्रभादेवी केतकी मैदान राजाभाई देसाई मार्गावर ‘आगरी भवन’ बांधण्यासाठी - १ लाख

० प्रभाग ७ मध्ये कोळी भवन बांधण्यासाठी - २५ कोटी

० रेसकोर्सवर थीमपार्क बनवण्यासाठी - १० लाख

० महापालिकेची क्रिकेट व फुटबॉल अकॅडेमी स्थापन करण्यासाठी - २५ लाख

० मुंबईमध्ये आंतरराष्ट्री दर्जाचे स्टेडिअम - १ लाख

० महापालिका पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या बांधकामासाठी - १ लाख

० शिवाजीपार्क येथे समुद्रात अस्थी विसर्जन करण्यासाठी समुद्रामध्ये रस्ता
बनवण्यासाठी - १ लाख

० कॉटनग्रीन स्टेशनच्या फलाटाला समांतर असलेला स्कायवॉक घोडपदेव कडून येणाऱ्या जनतेसाठी जोडणे - १० लाख

० हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच - ६० लाख

० ज्येष्ठ नागरिकांसाठी हॉस्पिटल ऑन व्हीलच्या उभारणीसाठी - १० लाख

० मुंबईत रुग्णवाहिकेची सेवा सुरु करण्यासाठी - १ लाख

० मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात जेनेरिक मेडिसिन दुकानांसाठी - ५ लाख

० बॅटरीवर चालणाऱ्या नवीन विद्युत बसगाड्या विकत घेण्यासाठी बेस्टला अनुदान - ५ कोटी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा