Advertisement

मराठा क्रांती मोर्चा : नवी मुंबईत इंटरनेट सेवा बंद

सोशल मिडीयावरून अफवांचे संदेश पसरून वातावरण अाणखी चिघळू नये म्हणून नवी मुंबईतील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात अाली अाहे.

मराठा क्रांती मोर्चा : नवी मुंबईत इंटरनेट सेवा बंद
SHARES

गुरूवारी काढण्यात अालेल्या मराठा क्रांती मोर्चाला नवी मुंबईतील कळंबोली येथे हिंसक वळण लागलं. या पार्श्वभूमीवर सोशल मिडीयावरून अफवांचे संदेश पसरून वातावरण अाणखी चिघळू नये म्हणून नवी मुंबईतील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात अाली अाहे. तसंच एसएमएस सेवाही बंद केली अाहे. गुरूवारी सकाळपासून बंद केलेली इंटरनेट अाणि एसएमएस सेवा शुक्रवारी दुपारी सुरू करण्यात येणार अाहे.


अनुचीत घटना न घडण्याची खबरदारी

मराठा अारक्षणासाठी गुरूवारी मुंबई, नवी मुंबई अाणि ठाणे येथे बंद पाळण्यात अाला. यावेळी मोर्चाही काढण्यात अाला. नवी मुंबईतील कळंबोली येथे या मोर्चाला हिंसक वळण लागलं. मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर अांदोलकांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या. तसंच पोलिसांवर दगडफेकही केली. अांदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहताच या बंदला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात अाली. मात्र, तरीही कळंबोली येथे मुंबई - पुणे द्रुतगती मार्ग अांदोलकांनी बंद केला होता. सोशल मिडीयावरून अफवा पसरून अाणखी मोठी अनुचीत घटना घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबईतील इंटरनेट अाणि एसएमएस सेवा सरकारकडून बंद करण्यात अाली.


कोपरखैरणेत पोलिस चौकीला अाग

मुंबईमध्ये मराठा मोर्चा शांततेत पार पडला. मात्र, कळंबोलीसह कोपरखैरणे येथेही बुधवारी संध्याकाळी अांदोलकांनी स्थानिक नागरिकांच्या वाहनांवर दगडफेक केली. तर सेक्टर ६ मधील पोलिस चौकीलाही अाग लावली. यावेळी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडून अांदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. सेक्टर ३ येथे एका हाॅटेलधील ५ ते ६ कार अाणि १० ते १२ दुचाकींचंही नुकसान करण्यात अालं. 



हेही वाचा - 

सेंट झेवियर्सला मिळाले मराठमोळे प्राचार्य

अभ्यासक्रम नवा, प्रश्न जुने! एलएलबीच्या प्रश्नपत्रिकेत पुन्हा घोळ!




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा