Advertisement

जे. जे. रुग्णालयात पहिल्यांदाच ब्रेनडेड रुग्णाचे अवयवदान


जे. जे. रुग्णालयात पहिल्यांदाच ब्रेनडेड रुग्णाचे अवयवदान
SHARES

जे. जे. रुग्णालयाच्या 172 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ब्रेनडेड रुग्णाचे अवयवदान करण्यात आलं. जळगावातील महाजन कुटुंबियांकडून हे अवयवदान करण्यात आलं आहे. अवयवदानाची परवानगी देणारे राज्यातील हे 33 वं कुटुंब ठरलं आहे.

जळगावमधील संगीता महाजन यांचा 17 जुलै रोजी मोटारसायकलच्या धडकेत अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या मेंदूला जबर मार बसला. त्यावेळी त्यांना जळगावच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे कळताच 20 जुलै रोजी त्यांना मुंबईतील सर. जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आलं.

जे. जे. रुग्णालयात त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. पण, डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केलं.यावेळी महाजन कुटुंबियांकडून अवयवदानासाठी होकार मिळवणे डॉक्टरांसमोर मोठं आव्हान होतं. तरीही त्यांनी हे आव्हान पूर्ण केलं आणि संगीता महाजन यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.



मी दहा वर्षांचा असताना माझ्या आईचा मृत्यू झाला. आता माझी पत्नीही हयात नाही. पण अवयवदानातून तिचं अस्तित्व या जगात राहील, या भावनेने आम्ही तिचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.

राजेश महाजन, संगीता महाजन यांचे पती


जे. जे. रुग्णालयात पहिल्यांदाच ब्रेनडेड रुग्णाचे अवयवदान करण्यात आले आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. हे जे. जे.साठी मोठं यश आहे. रुग्णांमध्ये तसेच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये अवयवदानाबद्दलची जनजागृती नसल्याने शासकीय रुग्णालयात आलेल्यांना अवयवदानासाठी प्रेरीत करणे कठीण असते. जे जे हॉस्पिटलमध्ये 70 टक्के रुग्ण हे ग्रामीण महाराष्ट्रातून येतात त्यामुळे जनजागृती करणं कठीण असते.

- डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय


संगीता महाजन यांचं यकृत आणि डोळे प्रत्यारोपणासाठी दान करण्यात आलं. यकृत अवयवदानाची शस्त्रक्रिया प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. गौरव चौबळ यांनी केली. सोलापूरातील बार्शीत राहणाऱ्या एका 56 वर्षीय व्यक्तीला संगीता यांचं यकृत प्रत्यारोपण करण्यात आलं. संगीता महाजन यांच्या अवयवदानामुळे मिळालेले लिव्हर ज्युपिटर रुग्णालयाला तर त्यांचे दोन डोळे जे.जे. रुग्णालयाला देण्यात आले आहेत. त्यांचा वापर या अवयवांची निकड असलेल्या रुग्णांसाठी होऊन त्यांना नवजीवन मिळाले आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा