मृत्यूनंतरही 'त्या'ने वाचवले 6 जीव!

 Mumbai
मृत्यूनंतरही 'त्या'ने वाचवले 6 जीव!
Mumbai  -  

रुग्णालयात दाखल करण्यात आलेला भाऊ ब्रेनडेड अवस्थेत गेला असला तरी तो अवयवस्वरुपी तरी या जगात अमर राहू शकतो, या विचाराने सख्ख्या बहिणीने भावाचे अवयवदान केले. त्या ब्रेनडेड मुलाने केलेल्या अवयवदानामुळे 6 जणांना नवे जीवन मिळाले आहे. मुलुंडच्या ज्युपिटर रुग्णालयात हे अवयवदान झाले.


ज्युपिटर रुग्णालयात झाला होता दाखल

मुलुंडमध्ये राहणारी एक 38 वर्षांची व्यक्ती बुधवारी नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी निघाली होती.  अचानक झालेल्या अपघातात त्या व्यक्तीच्या मेंदूला जबर मार बसला. त्यावेळी त्याला ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि लगेचच त्याच्या कुटुंबियांनाही या अपघाताची कल्पना देण्यात आली. त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तो ब्रेनडेड अवस्थेत असल्याचे सांगितले आणि कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

त्यानंतर अवयवदान समन्वयकांकडून रुग्णाच्या बहिणीला अवयवदानाबाबत सांगण्यात आले. आपला भाऊ अवयवस्वरुपी तरी या जगातच राहील या विचाराने बहिणीने त्याचे अवयवदान करण्यासाठी सहमती दर्शवली.

त्यानंतर त्या तरुणाचे हृदय ज्युपिटरमधील एका 56 वर्षीय रुग्णाला देण्यात आले. तर त्याचे यकृत ठाण्यातील एका 63 वर्षीय रुग्णाला देण्यात आले. एक मूत्रपिंड ज्युपिटर रुग्णालयातच ठेवण्यात आले. तर, दुसरे मूत्रपिंड बॉम्बे रुग्णालयाला देण्यात आले. शिवाय, त्वचा आणि डोळ्यांचेही दान करण्यात आले आहे.हेही वाचा -

हेच खरे ‘दान’शूर!

मॅरेथॉनमध्ये अवयव दानाचा संदेश


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


Loading Comments