जनता कर्फ्यू: राज्यात कोरोनाचे ७४ रूग्ण, मुंबई थांबली, रस्त्यांवर शुकशुकाट

कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिवसभर स्वत:हून जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईसह संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे.

जनता कर्फ्यू: राज्यात कोरोनाचे ७४ रूग्ण, मुंबई थांबली, रस्त्यांवर शुकशुकाट
SHARES

कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिवसभर स्वत:हून जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईसह संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. यामुळे मुंबईतील नेहमीच्या गजबजलेल्या ठिकाणांवर अक्षरश: शुकशुकाट बघायला मिळत आहे. लोकल, बस सेवा यासोबतच मुंबईचे रस्तेही निर्मनुष्य झाल्याचे पाहायला मिळत आहेत. एका अर्थाने मुंबई थांबली असंच हे चित्र आहे.

राज्यात कोरोनाची संख्या वाढून ७४ वर गेली आहे. तर मुंबईतील कोरोनाबाधीतांची संख्या वाढून २५ वर गेली आहे. यात २जण दगावलेे आहेत.


Pimpari 12

Pune 15

Mumbai 25

Nagpur 4

Yawatmal 4

Klayan 4

Navi mumbai 3

Ahamadnagar 2

Panel 1

Thane 1

Ulahasnagar 1

Ratnagiri 1

Aurangabad 1


Total 74 ( two death...active 72)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात रविवार २३ मार्च रोजी सकाळी ७ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रत्येक राज्यांकडून प्रतिसाद देण्यात आला. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने दिवसभरातील तब्बल ३ हजार ७०० हून ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही रेल्वे आणि बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. रेल्वे आणि बसच्या फेऱ्या कमी करतानाच सामान्य माणसांना या सेवांमधून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे एरवी सकाळच्या सुमारास हजारो प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट स्थानकांवर गर्दी नसल्याने सामसुम दिसत आहे. जागोजागी पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला असूनअत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं ओळखपत्र तपासूनच त्यांना सोडण्यात येत आहे.

 

मेट्रो आणि मोनोने आपली सेवा दिवसभर बंद ठेवलेली आहे. तर बेस्टनेही अत्यंत मोजक्या स्वरूपात बस सेवा सुरू ठेवली आहे. यामुळे भायखळा, परळ, दादर, कुर्ला, अंधेरी, घाटकोपर, बोरीवली इ. नेहमीच गजबजलेल्या परिसरातील रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत. या सर्व ठिकाणची दुकानं, हाॅटेल्स बंद असून फेरीवालेही गायब आहेत. रस्त्यांवरही खाजगी गाड्या दिसेनाशा झाल्या आहेत. यामुळे जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे.


संबंधित विषय