Advertisement

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचं मुंबईत आंदोलन

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचं वेतन गेल्या तीन महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळं जेटच्या कर्मचाऱ्यांनी आता आपल्या वेतनासाठी कंपनी प्रशासन आणि बँकांकडे धाव घेतली आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी मुंबई विमानतळावर प्रदर्शनही केलं.

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचं मुंबईत आंदोलन
SHARES

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचं वेतन गेल्या तीन महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळं जेटच्या कर्मचाऱ्यांनी आता आपल्या वेतनासाठी कंपनी प्रशासन आणि बँकांकडे धाव घेतली आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी मुंबई विमानतळावर प्रदर्शनही केलं. तसंच लवकरात लवकर आपलं वेतन देण्यात यावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, कंपनीनंही आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाण १५ एप्रिलपर्यंत बाधित राहणार असल्याचंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं.

तीन महिन्यांपासून वेतन नाही

तीन महिन्यांपासून आपल्याला विना वेतन काम करावं लागत असल्यानं समस्या वाढत असल्याची खंत जेट एअरवेजच्या एका कर्मचाऱ्यानं बोलून दाखवली. त्यातच लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना त्यांचं वेतन देण्याचं आश्वासन कंपनीनं दिलं असलं तरी अद्यापही त्यांवा वेतन देण्यात आलं नाही. सध्या देशभरात जेट एअरवेजचे १६ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तसंच आपण कंपनीच्या विरोधात नसून केवळ वेतन मिळावं अशी मागणी करत असल्याचं स्पष्टीकरणही कर्मचाऱ्यांकडून देण्यात आलं.

३० लाख डॉलर्सचं नुकसान

जेटला सद्यस्थितीत दररोज ३० लाख डॉलर्सचं नुकसान सोसावं लागत आहे. याव्यतिरिक्त त्यांच्या बंद विमानांची संख्याही आता ७९ वर पोहोचली आहे. बीएसईला दिलेल्या माहितीतही कंपनीच्या थकबाकीमुळे १० विमानांच उड्डाण बंद करण्यात आल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.




हेही वाचा -

जेट एअरवेजच्या प्रवाशांचा खोळंबा, डीजीसीआयनं रोखली उड्डाणं

Exclusive आयपीएलवर दहशतवादाचं सावट?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा