Advertisement

महापालिकेत नोकरीची संधी, ६८ पदांसाठी 'इथं' होणार मुलाखात

वरील शाखांमध्ये कनिष्ठ सल्लागार पदासाठी अर्ज करणारा अर्जदाराकडे एम. डी. किंवा एम. एस. किंवा डी. एन. बी. अशी शैक्षणिक पात्रता असावी.

महापालिकेत नोकरीची संधी, ६८ पदांसाठी 'इथं' होणार मुलाखात
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये अधिक प्रभावी वैद्यकीय सेवा-सुविधा देता याव्यात यासाठी डॉक्टरांची ६८ पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी येत्या शुक्रवारी आणि शनिवारी ‘वॉक ईन इंटरव्ह्यू’चं आयोजन करण्यात आलं आहे.

मुंबई सेंट्रल परिसरात असणाऱ्या महानगरपालिकेच्या बा. य. ल. नायर रुग्णालयात सकाळी ९ ते दुपारी १ या दरम्यान या मुलाखती होणार आहेत. या मुलाखतींद्वारे वरिष्ठ सल्लागार स्तरावरील ३२ पदे, तर कनिष्ठ सल्लागार स्तरावरील ३६ पदे अशी एकूण 68 पदे भरली जाणार आहेत

पालिकेच्या या वैद्यकीय पदांमध्ये भेषज्य (Medicine), शल्यचिकित्सा (Surgery), स्त्रीरोग तज्ज्ञ (Obst. & Gyn.), बालरोग तज्ज्ञ (Pediatrics), अस्थिरोग तज्ज्ञ (Orthopedics), भूल तज्ज्ञ (Anaesthesia), विकिरण तज्ज्ञ (Radiology), कान-नाक-घसा तज्ज्ञ (E.N.T.), नेत्र तज्ज्ञ (Ophthalmology), रोगनिदान तज्ज्ञ (Pathology) इत्यादी वैद्यकीय विद्या शाखांशी संबंधित विविध ६८ पदांचा समावेश आहे.

निवड होण्यासाठी पात्रता काय?

वरील शाखांमध्ये कनिष्ठ सल्लागार पदासाठी अर्ज करणारा अर्जदाराकडे एम. डी. किंवा एम. एस. किंवा डी. एन. बी. अशी शैक्षणिक पात्रता असावी. याशिवाय किमान ५ वर्षांचा कार्यानुभव असणं गरजेचं आहे. वरिष्ठ सल्लागार पदासाठीची शैक्षणिक पात्रता देखील एम. डी. किंवा एम. एस. किंवा डी. एन. बी. अशी आहे.

कार्यानुभव मात्र ८ वर्षांचा असणं गरजेचं आहे. तसंच वरिष्ठ सल्लागार पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तिनं किमान ३ संशोधन विषयक कामे केलेली असावीत. दुसरीकडे कनिष्ठ सल्लागार पदासाठी किमान २ संशोधन विषयक कामे आवश्यक आहेत. तसंच अर्जदाराला मराठी भाषा येणं आवश्यक आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना पगार किती?

निवड होणाऱ्या वरिष्ठ सल्लागारांना दरमहा रुपये २ लाख, तर कनिष्ठ सल्लागारांना दरमहा रुपये १ लाख ५० हजार रुपये इतके ढोबळ मानधन देण्यात येणार आहे.

कोणती कागदपत्रे सोबत असावीत?

‘वॉक ईन इंटरव्ह्यू’साठी येताना अर्जदारानं शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेची गुणपत्रिका, वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, नाव बदलले असल्यास संबंधित कागदपत्रं आणि त्यांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती सोबत ठेवाव्यात.हेही वाचा

कुर्ल्यातील मोटार स्पेअर पार्ट्सच्या दुकानाला भीषण आग, पहा व्हिडिओ...

तुम्हीच पाठवा विजेचं रिडिंग, ऊर्जामंत्र्यांचं ग्राहकांना आवाहन

संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा