Advertisement

कुर्ल्यातील मोटार स्पेअर पार्ट्सच्या दुकानाला भीषण आग, पहा व्हिडिओ...

आगीमुळे धुराचे मोठमोठे लोळ पाहायला मिळत होते. आग इतकी भीषण होती की तीन किलोमीटर अंतरावरुनही धुराचे लोळ दिसत होते .

कुर्ल्यातील मोटार स्पेअर पार्ट्सच्या दुकानाला भीषण आग, पहा व्हिडिओ...
(Image: ANI Twitter/ Video Screenshot)
SHARES

 मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटना वाढल्या आहेत. बुधवारी कुर्ला पश्चिमेकडे कपाडियानगरजवळ मोटार स्पेअर्स पार्ट्सच्या दुकानाला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

कुर्ला पश्चिम इथे बस डेपो रोडवर मोटार स्पेअर्स पार्ट्सचं दुकान आहे. बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही आग लागली. आगीमुळे धुराचे मोठमोठे लोळ पाहायला मिळत होते. आग इतकी भीषण होती की तीन किलोमीटर अंतरावरुनही धुराचे लोळ दिसत होते . 

ही लेव्हल २ ची आग असल्याचं फायर ब्रिगेडकडून सांगण्यात आलं आहे. घटनास्थळी ८ फायर इंजिन, ८ फायर टॅंकर दाखल झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेलं नाही.हेही वाचा -

  1. परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वरंटाईन सक्तीचं

  1. कोरोनाची लक्षणं नसलेल्यांची प्रतिजन चाचणी होणार नाही

Read this story in English
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा