Advertisement

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती


न्यायमूर्ती दीपांकर दत्ता उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती
SHARES

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी हे निवृत्त होत आहेत. येत्या २८ एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोलकाता उच्च न्यायालयातील सेवाज्येष्ठतेत दुसऱ्या क्रमांकावर असलेले न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची गुरुवारी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मागील आठवड्यात त्यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली होती. न्या. दत्ता यांची बढतीवर मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर १९८९ मध्ये वकिलीला सुरुवात केली. घटनात्मक वाद आणि दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे.

मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर कोलकात्याचे न्या. विश्‍वनाथ सोमादर यांची नियुक्ती करण्याची शिफारसही मंडळाने केली आहे. सध्या न्या. सोमादर हे अलाहाबाद उच्च न्यायालयात रुजू आहेत. कॉलेजिअम मंडळाने शनिवारीकेंद्र सरकारला यासंबंधी शिफारस केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा