Advertisement

न्या. प्रदीप नांदराजोग मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश

न्या. प्रदीप नांदराजोग यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बदली केली आहे. न्या. नांदरजोग हे सध्या राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.

न्या. प्रदीप नांदराजोग मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
SHARES

न्या. प्रदीप नांदराजोग यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बदली केली आहे. न्या. नांदरजोग हे सध्या राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. 

२०२० पर्यंत सांभाळणार कार्यभार

मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती नरेश पाटील ६ एप्रिल रोजी निवृत्त होणार आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर न्या. नांदरजोग हे त्या पदी रूजू होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने ४ दिवसांपूर्वी केलेली शिफारस मान्य करून, राष्ट्रपतींनी न्या. नांदराजोग यांच्या या नव्या नियुक्तीचा आदेश दिला. 

२२ वर्षे वकिली

२३ फेब्रुवारी २०२० पर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत राहतील. ते मूळचे दिल्ली येथील असून त्यांनी २२ वर्षे वकील म्हणून सेवा बजावली आहे. त्यानंतर १४ वर्षे त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कर्तव्य बजावलं.

त्यानंतर २ वर्षांपूर्वी त्यांना राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बदली करण्यात आली. यापूर्वी डिसेंबर महिन्यात त्यांची सर्वोच्च न्यायालयात नेमणूक करण्याचा निर्णय कॉलेजिअमनं घेतला होता. परंतु जानेवारी महिन्यात हा निर्णय रद्द करण्यात आला होता.

हेही वाचा -

हिमालय दुर्घटने प्रकरणी पालिकेच्या साहाय्यक अभियंत्याला अटक

वानखेडे स्टेडियमच्या दिशेनं जाणारा पादचारी पूल बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा