Advertisement

वानखेडे स्टेडियमच्या दिशेनं जाणारा पादचारी पूल बंद

मुंबईतल्या चर्चगेट परिसरातील वानखेडे स्टेडियमच्या गेट क्रमांक ४ च्या दिशेनं जाणारा शकुंतला कांतीलाल ईश्वरलाल जैन शाळेजवळील पादचारी पूल बंद करण्यात आला आहे. हा पूल धाेकादायक स्थितीत असल्यानं सोमवारपासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे.

वानखेडे स्टेडियमच्या दिशेनं जाणारा पादचारी पूल बंद
SHARES
Advertisement

मुंबईतल्या चर्चगेट परिसरातील वानखेडे स्टेडियमच्या गेट क्रमांक ४ च्या दिशेनं जाणारा शकुंतला कांतीलाल ईश्वरलाल जैन शाळेजवळील पादचारी पूल बंद करण्यात आला आहे. हा पूल धाेकादायक स्थितीत असल्यानं सोमवारपासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळं वानखेडे स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी या पुलाचा वापर करणाऱ्या क्रिकेटप्रेमींची माेठी गैरसाेय हाेणार आहे. 


धोकादायक स्थितीत पूल

हिमालय पादचारी पूलाच्या दुर्घटनेनंतर महापालिकेनं वानखेडे स्टेडियमच्या गेट क्रमांक ४ च्या दिशेनं जाणाऱ्या धोकादायक स्थितीतील पादचारी पुलाची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महापालिकेच्या ‘ए’ विभागानं दुरूस्तीच्या कामसाठी हा पूल बंद केला आहे. 


पर्यायी मार्गाचा वापर 

या परिसरात काही शाळा असल्यानं पालक व विद्यार्थी या पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्याशिवाय वानखेडे स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी जाणारे क्रिकेटप्रेमीसुद्धा या पुलाचा वापर करतात. परंतु, हा पुल दुरूस्तीसाठी बंद केल्यानं नागरिकांनी वानखेडे स्टेडियमकडं जाण्यासाठी महर्षी कर्वे रस्त्यावरील कलानिकेतन समोरील किंवा मरिन लाइन्स स्थानकाजवळील पादचारी पुलाचा वापर करावा, असं आवाहन पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयानं केलं आहे.हेही वाचा -

मुंबईत सर्वाधिक आगीच्या घटना, ६, ५३३ हेक्टर जंगल जळून खाक

जाणून घ्या व्हॉट्सअॅपमध्ये आलंय कोणतं नवं फिचर ?संबंधित विषय
Advertisement