Advertisement

मुंबईत सर्वाधिक आगीच्या घटना, ६, ५३३ हेक्टर जंगल जळून खाक

राज्यात गेल्या ५ वर्षांमध्ये आगीच्या १ हजार ११० घटना घडल्या आहेत. त्यातील वेगवेगळ्या घटनांमध्ये ६ हजार ५३३ हेक्टर जंगलाची जमीन जळून खाक झाल्याची माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे.

मुंबईत सर्वाधिक आगीच्या घटना, ६, ५३३ हेक्टर जंगल जळून खाक
SHARES

राज्यात गेल्या ५ वर्षांमध्ये आगीच्या १ हजार ११० घटना घडल्या आहेत. त्यातील वेगवेगळ्या घटनांमध्ये ६ हजार ५३३ हेक्टर जंगलाची जमीन जळून खाक झाल्याची माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे. 

वनसंपदेचं नुकसान

गेल्या ५ वर्षांमध्ये आग लागण्याच्या घटनांमुळे ९० कोटींच्या वनसंपदेचं नुकसान झाल्याची माहिती  समोर आली आहे. वॉचडॉग समुहानं २०१५ ते २०१९ या कालावधीत मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापुर, नाशिक आणि औरंगाबाद या ठिकाणी लागलेल्या जंगलातील आगींबाबत माहिती मागवली होती.

मुंबईत सर्वाधिक आग

माहिती अधिकारांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीला उत्तर देताना मुंबईत सर्वाधिक आग ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लागल्याचं समोर आलं. तसंच जंगलात लागलेल्या आगींपैकी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक आग ही केवळ कृषी आणि जमीन अधिग्रहणासाठी लावण्यात आली होती. वन विभागानं सादर केलेल्या आकडेवारीनुसार २०१५ ते २०१८ या कालावधीत आगीच्या घटनांमध्ये ११९ टक्क्यांची वाढ दिसून आली.

मुंबईनंतर सर्वाधिक ५२५ आगीच्या घटना नाशिकमध्ये घडल्या. नाशिकमध्ये जंगलात लागलेल्या आगीमुळं ४ हजार ९१७ हेक्टर जमीन जळून खाक झाली होती. तसंच या ठिकाणी लागलेल्या आगीत ५३.४८ कोटी रूपयांच्या वनसंपदेचं नुकसान झालं होतं.
हेही वाचा -

भटक्या कुत्र्यांनतर आता मांजरांची नसबंदी

रेल्वे स्टाॅलमध्ये आढळला उंदीर, वांद्र्यातील स्टॉल केला बंदRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा