Advertisement

भटक्या कुत्र्यांनतर आता मांजरांची नसबंदी

मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांप्रमाणे आता मांजरांचीही नसबंदी केली जाणार आहे. मांजरांची नसबंदी करून प्राणी उत्पत्ती नियंत्रण योजना राबविण्यात येणार आहे.

भटक्या कुत्र्यांनतर आता मांजरांची नसबंदी
SHARES

मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांप्रमाणे आता मांजरांचीही नसबंदी केली जाणार आहे. मांजरांची नसबंदी करून प्राणी उत्पत्ती नियंत्रण योजना राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेला भारतीय पशुकल्याण मंडळानं मंजुरी दिली असून, सोमवार १ एप्रिलपासून हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसंच, या उपक्रमासाठी महापालिकेकडून १ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 


मांजरांच्या संख्येत वाढ

मुंबई शहर उपनगरात मांजरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. श्वानांच्या तुलनेत मांजरांचं प्रजनन जास्त असून, मांजरीचं प्रजनन वषार्तून चार वेळा होतं. तर श्वानाचं प्रजनन २ वेळा होतं. भटकी मांजर ही एका वेळेस सरासरी २ ते ५ पिल्लांना जन्म देते. त्यांची संख्या श्वानांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे रोगराई-दुर्गंधीचं प्रमाण वाढलं आहे. याबाबत, नगरसेवकांकडून मांजरांचीही नसबंदी करावी, अशी मागणी करण्यात येत होती. शिवसेनेचे नगरसेवक अनिल पाटणकर यांनी मांजरांची नसबंदी करावी, अशी ठरावाची सूचनाही मांडली होती. 


उपक्रमासाठी १ कोटींची  तरतूद

महापालिकेनं या उपक्रमासाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसंच, या उपक्रमाअंतर्गत मांजर पकडून आणणं, नसबंदीसाठी दाखल करणं व सोडणं यासाठी एकूण १२०० रुपये खर्च येणार आहे. मुंबईत डब्ल्यूएसटी, वेल्फेअर आॅफ स्ट्रे डॉग, बॉम्बे एसपीसीए, आयडिया इंडिपेंडन्स आॅफ अ‍ॅनिमल्स, अहिंसा , मालाड, ‘उत्कर्ष सामाजिक संस्था अशा ठिकाणी मांजरांची नसबंदी केली जाणार आहे.



हेही वाचा -

वांद्रे स्थानकात उंदीर आढळलेला स्टॉल बंद

युवासेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पूनम महाजन यांनी घेतील उद्धव ठाकरेंची भेट



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा