Advertisement

कमला मिलमधील सर्व अनधिकृत बांधकामे तोडणार- मुख्यमंत्री


कमला मिलमधील सर्व अनधिकृत बांधकामे तोडणार- मुख्यमंत्री
SHARES

कमला मिल कंपाऊंडमधील 'वन-अबोव्ह' आणि 'मोजोस ब्रिस्टो' या पब्सला लागलेल्या आगीप्रकरणी पब मालकांवर कारवाई करण्यात येत असून त्यांच्यासोबत जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. याबरोबरच कंपाऊंडमधील बांधकामे आणि पब्सना परवानग्या देण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून निष्काळजीपणा दाखवला असेल, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. सोबतच ही सर्व अनधिकृत बांधकामे तात्काळ पाडून टाकण्यात येतील, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.



युद्धपातळीवर ऑडिट

कमला मिल कंपाऊंडमधील घटनास्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत पाहणी केली. कमला मिल कंपाउंडमधील बांधकामांचे युद्धपातळीवर ऑडिट करण्यात येईल. या पाहणीत जर कंपाऊंडमध्ये अनधिकृत बांधकामं आढळल्यास ती तात्काळ पाडली जातील, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. या घटनेची चौकशी करण्यासाठी अजोय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, असं त्यांनी स्पष्ट केलं.


परवानगी नसलेले हॉटेल्स पडणार

मुंबईत काही संशयित बांधकामं आहेत, त्याचं ऑडिट करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. तसंच जे हॉटेल्स विनापरवाना चालत असतील, त्यांना पाडून टाकलं पाहिजे, असंही ते म्हणाले.



हेही वाचा-

कमला मिल आग: महापालिकेच्या ५ अधिकाऱ्यांचं निलंबन

कमला मिल आग: मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा