Advertisement

'त्या' दुकान मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल


'त्या' दुकान मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
SHARES

साकीनाका येथे सोमवारी पहाटे फरसाणच्या दुकानाला लागलेल्या आगीत १२ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून ८ जण गंभीररित्या जखमी झाले. दरम्यान साकीनाका पोलिसांनी या कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या दुकान मालक रमेश भानूशाली याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवत सोमवारी रात्री उशिरा त्याला अटक केली.


विनापरवानाच चालवायचा दुकान

खैराणी रोड परिसरात आग लागलेल्या या गाळ्यांचं बांधकाम ४० वर्ष जुनं आहे. तर खैराणी रोड ते असल्फापर्यंत छोटेमोठे उद्योग विना परवानाच सुरू आहेत. याच ठिकाणी दीड वर्षांपूर्वी रमेश भानूशालीने फरसाण बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. मात्र व्यवसाय सुरू करताना त्यासाठी लागणारे विविध परवानाच त्याने घेतल्या नव्हत्या. याचसोबत तेथे काम करणाऱ्या कामगारांची राहण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी गाळ्याच्या मूळ बांधकामात अवधैरित्या बदल करत त्याने पोटमाळ्याचं बांधकाम केलं होतं. तसंच फरसाण बनवण्यासाठी लागणारा गॅस आणि इतर ज्वलनशील पदार्थ विनापरवानाच साठवल्याचं पोलीस तपासातून पुढे आलं आहे. 


शॅाट सर्किटमुळे आग

अग्निशमन दलाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालात ही आग शॅाट सर्किटमुळे लागल्याचं म्हटलं आहे.

साकीनाका आग प्रकरणात १२ कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत असलेला दुकानमालक रमेश भानूशालीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवत सोमवारी रात्री त्याला अटक करण्यात आली आहे. पालिकेच्या अंतिम अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

- एन रेड्डी, पोलीस उपायुक्त, झोन १०

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा