• बच्चे कंपनीच्या शुभहस्ते कामाचा शुभारंभ सोहळा
  • बच्चे कंपनीच्या शुभहस्ते कामाचा शुभारंभ सोहळा
  • बच्चे कंपनीच्या शुभहस्ते कामाचा शुभारंभ सोहळा
  • बच्चे कंपनीच्या शुभहस्ते कामाचा शुभारंभ सोहळा
SHARE

परळ - लालबाग येथे साने गुरुजी मार्गाचे काँक्रिटीकरण होणार आहे. या कामाचा शुभारंभ सोहळा बालदिनानिमित्त लालबाग परिसरातील बच्चेकंपनीच्या हस्ते साने गुरुजी मार्गावर करण्यात आला. या वेळी नगरसेवक संजय (नाना) आंबोले आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बालदिनानिमित्तचचा हा सोहळा 'बालमित्र नाना आणि बच्चेकंपनी' अशा संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता. नेहमी आई वडिलांचं ऐका, त्यांचा मान ठेवा आणि त्यांचा नेहमी आदर करा, असं संजय आंबोले यांनी या वेळी बच्चे कंपनीला सांगितलं. या काँक्रिटीकरणाचं काम आंबोले यांनी महानगरपालिकेच्या सन 2015-16 च्या अर्थसंकल्पातल्या निधीतून मंजूर करून घेतलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या