Advertisement

रेल्वे प्रशासनाचा नवा उपक्रम


रेल्वे प्रशासनाचा नवा उपक्रम
SHARES

लोअर परळ - रेल्वे स्थानकांची महती प्रवाशांना सांगण्यासाठी 'हमारा स्टेशन हमारी शान' या योजनेंतर्गत लोअर परळ आणि करी रोड स्थानकांचं महत्त्व आणि माहिती देणारे फलक या स्थानकांवर लावण्यात आलेत.
लोअर परळ हे स्थानक परळच्या दक्षिणेला आणि नकाशात खालच्या बाजूला असल्यानं त्याला लोअर परळ असं नाव पडलंय. लोअर परळचं औद्योगिक क्षेत्रातलं सध्याचं महत्त्वही यां फलकांद्वारे सांगण्यात आलंय. ब्रिटिश काळात करी रोड स्थानकाचं झालेलं नामकरण आणि हे स्थानक का स्थापन करण्यात आलं, अशी माहितीही देण्यात आली. या ऐतिहासिक स्थानकाची काळजी घेणं आणि स्वछता राखणंही गरजेचं आहे, हेसुद्धा या फलकांद्वारे सांगण्यात आलंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा