Advertisement

कुंभमेळ्याहून लोकं 'कोरोना' प्रसाद घेऊन येतायत - किशोरी पेडणेकर

कुंभमेळ्याहून परत येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करण्याचा विचार आम्ही करत असल्याचं देखील महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं

कुंभमेळ्याहून लोकं 'कोरोना' प्रसाद घेऊन येतायत - किशोरी पेडणेकर
(File Image)
SHARES

कुंभमेळ्याहून परत येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करण्याचा विचार आम्ही करत असल्याचं देखील महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं. 'कुंभमेळ्याहून आपापल्या राज्यात जाणारी लोकं सोबत ‘प्रसाद’ म्हणून कोरोना आणत आहेत.

या सर्व लोकांना त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये क्वारंटाईन करायला हवं. त्याचा खर्च त्या लोकांकडूनच घ्यायला हवा. मुंबईत देखील आम्ही कुंभ मेळ्याहून परतणाऱ्या नागरिकांना परतल्यानंतर क्वारंटाईन करण्याचा विचार करत आहोत', असं पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.

मुंबईसह आसपासच्या परिसरात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. शिवाय, सध्याची भयावह स्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 'कोविड-१९ ची सध्याची परिस्थिती पाहाता संपूर्ण लॉकडाऊन लागू करायला हवा', असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धन ठाकरे यांनी १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजेपासून राज्यात लॉकडाऊन लागू केला. मात्र, हा लॉकडाऊन पूर्ण स्वरूपात लागू न करता जीवनावश्यक सेवांसोबतच काही इतर सेवा आणि उद्योगांना देखील यातून सूट देण्यात आली आहे. त्यासोबतच, सामान्य नागरिकांना देखील काही अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे.

मुंबईतल्या ५ टक्के बेजबाबदार नागरिकांमुळे उरलेल्या ९५ टक्के नागरिकांना अडचण होत असल्याचं महापौर म्हणाल्या. '९५ टक्के मुंबईकर कोविड-१९ च्या नियमांचं पालन करतात. पण ५ टक्के लोकं निर्बंधांचं पालन करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामुळे इतरांना अडचण होते. यासाठीच मला वाटतं सध्याची परिस्थिती पाहाता संपूर्ण लॉकडाऊन लागू करायला हवा', असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा