Advertisement

मुंबईतील श्रमिक वस्त्यांमधील कुटुंबांच्या मासिक खर्चात वाढ


मुंबईतील श्रमिक वस्त्यांमधील कुटुंबांच्या मासिक खर्चात वाढ
SHARES

लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील श्रमिक वस्त्यांमधील कुटुंबांच्या मासिक खर्चात वाढ झाली आहे. या वस्त्यामधील कुटुंबियांना पूर्वी पाण्यासाठी महिन्याला साधारण ६०० रुपये खर्च करणाऱ्या कुटुंबाला ७०० ते ७५० रुपये खर्च करावे लागले आहेत. तसेच शौचालयाचा खर्च मासिक ५० रुपयांवरून २७० रुपयांवर गेला आहे.

पाणी हक्क समिती, सेंटर फॉर प्रोमोटिंग डेमॉक्रसी आणि विकास अध्ययन केंद्र यांनी के लेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. मुंबईतील ३३ वस्त्यांमधील २९२ कुटुंबे सर्वेक्षणात सहभागी झाली होती. त्यातील २५ टक्के कुटुंबांना दररोज पाणी मिळत नाही. १९ टक्के कुटुंबांना लॉकडाऊमध्ये पाण्यासाठी दूरवर जावे लागले. त्यामुळे ३ टक्के कुटुंबांना पोलिसी कारवाईलाही सामोरे जावे लागले.

लॉकडाऊनमध्ये संपूर्ण कुटुंब घरात असल्याने आणि करोनाच्या भीतीने स्वच्छतेसाठी पाण्याचा वापर वाढला. टाळेबंदीपूर्वी काही ठिकाणांहून पाणी मोफत मिळवता येत असे; ते स्रोत बंद झाले. त्यामुळे पाणी विकत घेण्याचे प्रमाण वाढून खर्चही वाढला. महिन्याला ७०० ते ७५० रुपये म्हणजेच मासिक उत्पन्नाच्या ८ टक्के खर्च करावा लागला.

सर्वेक्षणात सहभागी कुटुंबांपैकी १८ टक्के  कुटुंबांना शौचालयाअभावी उघड्यावर शौचास जाणे भाग पडते. ७५ टक्के कुटुंबे सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. कुटुंबासाठी सार्वजनिक शौचालयाचा मासिक पास ५० रुपयांत मिळतो, पण लॉकडाऊनमध्ये कोरोना संसर्गाच्या भीतीने अनेक ठिकाणी शौचालये बंद ठेवण्यात आली. त्यामुळे नेहमीच्या शौचालयाऐवजी इतर शौचालयांचा वापर नागरिकांना करावा लागला. यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागले. तसेच कु टुंबातील सर्व सदस्य घरीच असल्याने शौचालयाचा वापर वाढला. त्यामुळे प्रत्येक कु टुंबाला शौचालयासाठी मासिक २७० रुपये खर्च आला.

केवळ २० टक्के कु टुंबांना टाळेबंदीदरम्यान घरातील कचरा जमा करण्याची सुविधा उपलब्ध झाली. ९२ टक्के कु टुंबांना करोनापासून वाचण्यासाठी मुखपट्टी वापरण्याची जाणीव झाली आहे आणि ७६ टक्के  कु टुंबांना वारंवार हात धुण्याचे महत्त्व पटलेले दिसून येते. मात्र, पुरेसे पाणी नसल्याने वारंवार हात धुणे आणि नेहमी अंघोळ करणे शक्य होत नाही, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा