Advertisement

पोटात गेल्या आरपार सळ्या, तरीही तो वाचला!


पोटात गेल्या आरपार सळ्या, तरीही तो वाचला!
SHARES

कफ परेड इथल्या इमारतीच्या तळमजल्यावर स्लॅबचे काम सुरू असताना राजेंद्र पाल या कामगाराचा तोल जाऊल तो पडला. यामध्ये त्याच्या शरीरात दोन सळ्या आरपार गेल्या. पण, तरीही त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

इमारतीत स्लॅबचं काम सुरू असताना त्याचा तोल जाऊन तो खाली पडला आणि बघताच क्षणी तो रक्तबंबाळ झाला. कारण, त्याच्या शरीरात दोन सळ्या घुसल्या होत्या. त्याला तात्काळ गोकुळदास तेजपाल रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करुन त्याच्या शरीरातून त्या दोन्ही सळ्या काढल्या.


नेमकं काय घडलं?

कफ परेडच्या रहेजा चेंबर येथील तळघरात स्लॅबचे काम सुरु आहे. स्लॅबच्या कामाकरता लोखंडी सळईचा ढाचा उभारण्यात आला होता. सायंकाळी राजेंद्र हा प्लायवुडवरून जात असताना त्याचा तोल गेला आणि तो पडला. त्यावेळी त्याच्या पोटात दोन सळया आरपार घुसल्या आणि तो रक्तबंबाळ झाला.

राजेंद्रच्या पोटात आणि छातीत सळई घुसली होती. पोटात घुसलेल्या दोन सळया गॅसकटरने कट करून रुग्णालयात रुग्णाला आणण्यात आलं. त्यानंतर अडीच तासांच्या अवघड शस्रक्रियेनंतर त्याच्या छातीमधील आणि पोटातील सळई काढण्यात डॉ. जितेंद्र संकपाळ यांना यश आलं. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर दोन्ही सळया काढण्यात आल्या. दरम्यान, दोन सळया घुसल्या, तेव्हा त्याच्या हृदयाला आणि फुप्फुसाला सुदैवानं कोणतीही इजा झालेली नाही. त्यामुळे त्याची प्रकृती स्थिर आहे, असंही डॉ. संकपाळ यांनी सांगितलं.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा