Advertisement

35 तासांच्या विलंबानंतर लालबागचा राजाचे विसर्जन

अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता लालबाग राजाचे विसर्जन झाले.

35 तासांच्या विलंबानंतर लालबागचा राजाचे विसर्जन
SHARES

मुंबईतील गणेशोत्सवामध्ये दरवर्षी चर्चेचा विषय ठरणारा प्रसिद्ध 'लालबागचा राजा' गणपती मंडळ विसर्जनच्या दिवशी वेगळ्याच कारणाने चर्चेत आलं. या गणपतीच्या विसर्जनात यंदा प्रथमच अडथळे आल्याचं पाहायला मिळालं. अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता लालबाग राजाचे विसर्जन झाले.

भरती आणि खास गुजरातहून विसर्जनासाठी आणलेल्या अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवताना कसरत करावी लागली. यामुळे राजाच्या विसर्जनाला यंदा 36 तासांपेक्षा अधिक काळ लागला. 

गेली अनेक वर्षे लालबागचा राजाचे विसर्जन हे कोळी बांधवांच्या मदतीने केले जात होते. गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर म्हणाले की, काही कारणांमुळे ओहोटी-भरतीचा अंदाज लालबागचा राजा मंडळाला आला नाही. आम्ही वाडकर बंधू बरीच वर्षे लालबागचा राजाचे विसर्जन करत आलो आहोत. मात्र काही कारणांमुळे राजाचे विसर्जन आता वाडकर बंधूकडे नाही. गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागचा राजा मंडळाने हे कंत्राट त्यांना दिले आहे. पण यापुढे मंडळाने विसर्जनाची काळजी घ्यायला हवी.ॉ

सायंकाळी साडेचारच्या दरम्यान भरती कमी झाल्यानंतर राजाची मूर्ती असणारी ट्रॉली पुढे सरकली आणि ती तराफ्यावर ठेवण्यात मंडळाला यश आले.

'लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी यंदा गुजरातमध्ये तयार केलेला अत्याधुनिक मोटराइज्ड तराफा यंदा प्रथमच वापरण्यात आला. पूर्वीच्या तराफ्यापेक्षा याचा आकार दुप्पट असून याच्या तळाशी विशेष प्रोपेलर प्रणाली बसवण्यात आली आहे. लाटांचा वेग, दिशा लक्षात घेऊन स्थैर्य सांभाळताना हा तराफा स्वतःच नियंत्रण ठेवू शकतो.

मात्र, यंदा विसर्जनासाठी गुजरातवरून आणलेला तराफा वापरला गेला. इतर ससार्वजनिक मंडळांच्या गणपतींच्या विसर्जनासाठी बोटी वापरण्यात आल्या. मात्र, लालबाग राजा मंडळाने तराफ्यावरुनच विसर्जन करायचे, हा निर्णय कामय ठेवला. गुजरातवरून आणलेला तराफ्यामुळे गोंधळ झाल्यानंतर दुसरा तराफा मागवण्यात आला आणि त्यावरूनच विसर्जन झालं. 

कोस्टल रोड मार्गे दक्षिण मुंबई आणि ओशिवराला जोडणारी बस सेवा सुरू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा