झोमॅटो कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये 20 टक्क्यांनी वाढ केली आहे. प्रत्येक ऑर्डरसाठी आधी 10 रुपयांऐवजी 12 रुपये घेणार असल्याची घोषणा केली. 2 रुपयांनी प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केल्याने आता ऑर्डरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. ही नवी फी देशभरात ज्या-ज्या शहरांत झोमॅटो सेवा देते, तिथे लागू होणार आहे.
सतत वाढते शुल्क
मागच्या काही काळापासून झोमॅटो सतत आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ करत असल्याचं दिसत आहे. गेल्या वर्षीही फेस्टिव सीझनच्या आधी कंपनीने आपली फी 6 रुपयांवरून 10 रुपयांपर्यंत वाढवली होती. त्यापूर्वी तीन महिन्यांपूर्वी फी 5 रुपयांवरून 6 रुपये करण्यात आली होती. आता चक्क दोन रुपयांनी वाढ केली असून त्याचा फटका रेस्टॉरंट मालक आणि ग्राहकांना बसणार आहे.
झोमॅटोच्या या निर्णयामुळे ग्राहकांना आता प्रत्येक ऑर्डरसाठी जास्त पैसे द्यावे लागतील. कंपनीचं म्हणणं आहे की बाजारातील बदलत्या परिस्थिती आणि वाढत्या खर्चामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे.
फेस्टिव सीझनमध्ये ऑर्डर वाढण्याची शक्यता असल्याने कंपनी हा काळ आपल्या वाढीसाठी वापरण्याचा विचार करत आहे. जून 2025 संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा 36 टक्क्यांनी घटून 25 कोटी रुपयांवर आला, जो मागील तिमाहीत 39 कोटी रुपये होता.
हेही वाचा