कचऱ्याच्या विघटनासाठी 'सेग्रेगेशन मॅन'

परळ -  आजवर आपण सुपरमॅन, स्पायडरमॅन पाहिलाय. पण आता मुंबईत आपल्या भेटीला आलाय सेग्रेगेशन मॅन! महानगरपालिकेच्या एफ दक्षिण विभागाच्या वतीनं कचऱ्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन व्हावं, यासाठी ही संकल्पना राबवण्यात येतेय. सावित्रिबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं, 3 जानेवारीपासून ही संकल्पना अंमलात आणण्यात आली. नगरसेवक संजय आंबोले तसंच विश्वास मोटे, परशुराम कुऱ्हाडे, संजय मोहिते, सुरेश पाटील, नीता वाघ, पूजा साटम आदी महापालिका कर्मचारी-अधिकारी आणि वरदा आर्ट्सच्या संस्थापक समता अभिषेक पांचाळ आदी या वेळी उपस्थित होते. 

Loading Comments