Advertisement

'सावित्रीबाईंच्या जीवनातील व्यथा'


'सावित्रीबाईंच्या जीवनातील व्यथा'
SHARES

दादर (पू.) - समस्त स्त्रियांकरता शिक्षणाची दारे उघडून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.
त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने 'सावित्रीबाईंच्या जीवनातील व्यथा' या विषयावर व्यख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. सिद्धार्थनगर युवक संघाच्या वतीने दादर (पू.) येथील कार्यालयात 7 जानेवारीला झालेल्या या व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड उपस्थित होते.
प्रा. गायकवाड यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावरील आधारित कथा सांगताना त्यांना कशापद्धतीने महात्मा फुलेंनी शिक्षण दिलं. हे सर्व करत असतांना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र या सर्व अडचणींवर मात करत त्यांनी स्त्रियांना शिकवले म्हणूनच आजची स्त्री राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आदी क्षेत्रामध्ये उच्च पदावर विराजमान झाली आहे. त्यामुळेच भारत आज महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहू लागला असल्याचं मत प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांनी व्यक्त केलं. या वेळी रिझर्व्ह बँकेचे माजी व्यवस्थापक कवी श्रीकृष्ण ठोंबरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेंद्र कांबळे, शीतल जाधव, सुनीता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा