Advertisement

Corona virus: गानसम्राज्ञी लता मंगेशकरकडून 25 लाखांची मदत


Corona virus: गानसम्राज्ञी लता मंगेशकरकडून 25 लाखांची मदत
SHARES

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात २१ दिवस लॉकडाउन करण्यात आला आहे. सध्या या लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सारे काही बंद ठेवण्यात आले आहे. तसेच देशातील काही जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रसंगी अनेक सामाजिक संस्था आणि कलाकार मंडळींनी त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे. यात ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये काही रक्कम जमा केली आहे.


लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये २५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली असून याविषयीची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. तसेच प्रत्येकाला जसे शक्य होईल तशी मदत करावी असे आवाहनही केले आहे.
नमस्कार. आपण आपल्या सरकारला या कठीण प्रसंगी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मी माझ्यातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपये देत आहे. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सरकारच्या कोरोना विरोधी लढ्यात आपण सुद्धा सरकारला यथाशक्ती मदत करावी, असे लता मंगेशकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, आतापर्यंत अनेक कलाकार मदतीसाठी पुढे आले आहेत. यात चिरंजीवी, प्रभास, महेश बाबू, प्रशांत दामले, सलमान खान, अक्षय कुमार या आणि अशा अनेक कलाकारांनी आर्थिक मदत केली आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा