अंधेरीकरांची खड्ड्यांतून होणार मुक्तता

 Andheri
अंधेरीकरांची खड्ड्यांतून होणार मुक्तता
अंधेरीकरांची खड्ड्यांतून होणार मुक्तता
See all

अंधेरी - अंधेरी पूर्वमधील दामजी श्यामंजी कंपनी ते हॉली फॅमेली शाळेपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामास लवकरच सुरूवात केली जाईल अशी माहिती नगरसेविका सुनिता इलावडेकर यांनी दिलीय. मागील दोन वर्षांपासून या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. याबाबत नगरसेविका सुनिता इलावडेकर यांच्याकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत त्यांनी लोखंडी झाकणे टाकली होती. मात्र अवजड वाहनांमुळे ती झाकणं दाबून जायची व काही झाकणं गर्दुले लोक चोरी करत असल्यानं पुन्हा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडलेत. मात्र आता रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करणार असल्याची माहिती देत नगरसेविका सुनिता इलावडेकर यांनी नागरिकांना दिलासा दिलाय.

Loading Comments