Advertisement

प्रभादेवी येथील गोदामाला भीषण आग

प्रभादेवीतील गॅमन हाऊस इमारतीच्या तळमजल्याला आणि बेसमेंटमध्ये ही आग लागली आहे. तळमजल्यावर इलेक्ट्रिक वायरचं गोडाऊन आहे.

प्रभादेवी येथील गोदामाला भीषण आग
(Representational Image)
SHARES

मुंबईतील प्रभादेवीत इलेक्ट्रिक वायरच्या गोडाऊनला शनिवारी सकाळी भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १६ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.  ही आग मोठी असून आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

प्रभादेवीतील गॅमन हाऊस इमारतीच्या तळमजल्याला आणि बेसमेंटमध्ये ही आग लागली आहे. तळमजल्यावर इलेक्ट्रिक वायरचं गोडाऊन आहे. अग्निशमन दलाचे एडीओ पवार आणि शिर्के यांच्यासहीत १२ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

राज्यात आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. शनिवारी भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला भीषण आग लागून १२ जणांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ मुंबई, अंबरनाथ, बदलापूर आणि पुण्यात आगीच्या घटना घडल्या आहेत.

पुण्याच्या कॅम्प परिसरात असणाऱ्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये शुक्रवारी रात्री भीषण आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तीन तासांनी ही आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र  फॅशन स्ट्रीट मार्केटमधील तब्बल ८०० दुकानं जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे व्यापाऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.

हेही वाचा -

  1. बदलापूरमध्ये कंपनी आगीत जळून खाक

  1. सनराईज रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा