Advertisement

के थोडी-थोडी पिया करो... नव्या वर्षात विदेशी मद्य महागणार

राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागानं विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात १८ ते २० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ जानेवारी २०१९ पासून वाढीव उत्पादन शुल्क लागू होणार असल्यानं नव्या वर्षात विदेशी मद्यासाठी तळीरामांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

के थोडी-थोडी पिया करो... नव्या वर्षात विदेशी मद्य महागणार
SHARES

हुई महंगी बहुत ही शराब की थोड़ी-थोड़ी पिया करो, असं म्हणत विदेशी मद्यप्रेमींना नव वर्ष काढावं लागणार आहे. कारण विदेशी मद्य नव्या वर्षात महागणार आहे. राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागानं विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात १८ ते २० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ जानेवारी २०१९ पासून वाढीव उत्पादन शुल्क लागू होणार असल्यानं नव्या वर्षात विदेशी मद्यासाठी तळीरामांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.


महसुलाचा स्त्रोत

राज्य सरकारचा महसुलाचा एक महत्त्वाचं स्त्रोत म्हणून उत्पादन शुल्काकडे पाहिलं जातं. विविध वस्तूंवर उत्पादन शुल्क आकारत राज्याच्या तिजोरीत भर टाकली जाते. सध्या राज्याच्या तिजोरीत खडखडाट असून नुकतंच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवं वेतन लागू करण्यात आलं आहे. सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात असून पायाभूत सुविधा प्रकल्पांचाही भरणा मोठा आहे.


तिजोरीत भर

या सर्व बाबींचा ताण सरकारच्या तिजोरीवर पडत आहे. या वर्षात सरकारी तिजोरीवर अतिरिक्त २४ हजार ४८५ कोटींचा बोजा पडणार आहे. त्यामुळे तिजोरीवरील हा ताण कमी करण्यासाठी तसेच तिजोरीत भर टाकण्यासाठी सरकारनं विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात १८ तेे २० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेत ही वाढ लागू केली आहे.


वाढ लागू

विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात १८ ते २० टक्क्यांची वाढ आता लागू झाली आहे. या शुल्कवाढीमुळे विदेशी मद्याच्या दरात मोठी वाढ होणार आहे. तर विदेशी मद्याच्या वाढीव उत्पादन शुल्कातून सरकारी तिजोरीत ५०० कोटींची भर पडणार आहे.हेही वाचा-

Good News! तिकीट झाले स्वस्त, सिनेप्रेमींना नववर्षाची भेट

दारू पिऊन गाडी चालवाल, तर ६ महिन्यांसाठी लायसन्स होईल रद्दRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा