Advertisement

१४ एप्रिलपर्यंत मद्य विक्रीस बंदी

राज्य उत्पादन शुल्क विभागानं एक परिपत्रक जारी केलं आहे, त्यानुसार राज्यात पुढील १४ एप्रिलपर्यंत मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली आहे.

१४ एप्रिलपर्यंत मद्य विक्रीस बंदी
SHARES

राज्यात कोरोनाग्रस्त (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत राज्यात 200 हून अधिक जणांना कोरोनाची (Covid - 19) लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. राज्य सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलं. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागानं एक परिपत्रक जारी केलं आहे, त्यानुसार राज्यात पुढील १४ एप्रिलपर्यंत मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार राज्यात ३१ मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली होती. पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागानं कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे पाहता ही तारीख १४ एप्रिलपर्यंत करण्याचं ठरवलं आहे.

परिपत्रकानुसार कोरोना व्हायसरच्या प्रसाराचे माध्यम पाहता हा एका रुग्णाकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीस याचा संसर्ग होतो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी पुढील १४ एप्रिलपर्यंत सर्व मद्याची दुकानं बंद राहतील. या नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून मद्य विक्री सुरू करण्यासंदर्भात मागणी केली जात होती. मात्र राज्य सरकारनं यावर कडक नियमावली केली आहे आणि १४ एप्रिलपर्यंत मद्य विक्री बंद ठेवण्याचं जाहीर केलं आहे.

राज्यात (maharashtra) कोरोनाग्रस्त (coronavirus) रुग्णांच्या मृतांचा आकडा दहावर पोहोचला आहे. तर १९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकार लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा विचार करीत आहे.



हेही वाचा

१५ दिवसांच्या अंतरानेच होणार घरगुती गॅस सिलेंडरचं बुकिंग

कोरोना रूग्णाच्या अंत्यसंस्काराला फक्त ५ लोकांना परवानगी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा