Advertisement

पार्ले ते चारकोप परिसरात रविवारी अंधार

के-पश्चिम, पी-दक्षिण, पी-उत्तर, आर-दक्षिण, आर-मध्य आणि एच-पश्चिम वाॅर्डातील विर्ले-पार्ले, जुहू, अंधेरी, वर्सोवा, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि चारकोप परिसरातील विद्युत पुरवठा पहाटे ३ ते सकाळी ७ या वेळेत बंद राहील.

पार्ले ते चारकोप परिसरात रविवारी अंधार
SHARES

रविवारी, २५ मार्चला विर्लेपार्ले पश्चिम ते कांदिवली, चारकोपचा परिसर अंधारात जाणार आहे. रविवारी पहाटे ३ ते सकाळी ७ वाजेपर्यंत या परिसरातील विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मेट्रो-७ च्या कामासाठी या परिसरात विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.


विद्युत वाहिन्यांची उंची वाढवणार

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो-७च्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या विद्युत वाहिन्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांमध्ये परावर्तित करण्यासाठी वाहिन्यांची उंची वाढवण्यात येणार आहे. सध्याच्या विद्युत वाहिन्यांची उंची १४ मीटर असून आता ही उंची २१.५ मीटर अशी करण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रोचे काम सातत्याने सुरू ठेवणे शक्य होणार आहे.



ऐन उन्हाळ्यात फॅन होणार बंद

यासाठी रविवारी के-पश्चिम, पी-दक्षिण, पी-उत्तर, आर-दक्षिण, आर-मध्य आणि एच-पश्चिम वाॅर्डातील विर्ले-पार्ले, जुहू, अंधेरी, वर्सोवा, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि चारकोप परिसरातील विद्युत पुरवठा पहाटे ३ ते सकाळी ७ या वेळेत बंद राहील, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)कडून देण्यात आली आहे.


रविवारची पहाट होणार घामाघूम

एवोन प्लाझा सोसायटी आणि ठाकूर काॅम्प्लेक्स, कांदिवली या भागातील विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यानं विर्लेपार्ले ते चारकोपदरम्यानच्या लोकांना रविवारची पहाट अंधारात घालवावी लागणार आहे.



हेही वाचा

मेट्रो २ ब आणि मेट्रो ४ साठी कंत्राटदारांची नियुक्ती, लवकरच कामाला सुरुवात


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा