Advertisement

मेट्रो २ ब आणि मेट्रो ४ साठी कंत्राटदारांची नियुक्ती, लवकरच कामाला सुरुवात


मेट्रो २ ब आणि मेट्रो ४ साठी कंत्राटदारांची नियुक्ती, लवकरच कामाला सुरुवात
SHARES

मुंबईतील मेट्रो २ ब आणि मेट्रो ४च्या विविध पॅकेजसाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीची बैठक पार पडली. यावेळी या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.मेट्रो २ब - डीएन नगर ते मंडाले मेट्रो

बैठकीमध्ये डीएन नगर ते मंडाले मेट्रो या मेट्रो २बच्या ६व्या पॅकेज मे. एम. बी. झेड आणि मे. आरसीसी या कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ७व्या टप्प्याच्या उन्नत मार्ग आणि स्थानकांच्या बांधकामासाठी मे. जीजीव्हायएचपीसीएल, मे. नीरज सिमेंट स्ट्रक्चरल लिमिटेड आणि मे. एमपीकेएचएस प्रा. लि. या कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण १० हजार ९८६ कोटींच्या या कामामध्ये मेट्रोच्या ११ स्थानकांचा समावेश आहे.


समाविष्ट स्थानके

एमटीएनएल मेट्रो, एसजी बर्वे मार्ग, कुर्ला टर्मिनस, कुर्ला(पूर्व) द्रुतगती महामार्ग, चेंबुर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द, मंडाले


मेट्रो ४ कासारवडवली मार्गिका

मेट्रो ४च्या कासारवडवली मार्गिकेसाठीही कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण ५ पॅकेजचा यात समावेश असून प्रत्येक पॅकेज स्वतंत्र कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.


पॅकेजस्थानकंकंत्राटदार
पॅकेज ८भक्ती पार्क, वडाळा टीटी, आणिक नगर बस डेपो, सुमन नगर, सिद्धार्थ नगर, सिद्धार्थ कॉलनी, अमर महल जंक्शनमे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि., मे. एएसटीएएलडीआय
पॅकेज ९गरोडिया नगर, पंतनगर, लक्ष्मी नगर, श्रेयस सिनेमा, गोदरेज कंपनी, विक्रोळी मेट्रो, सूर्या नगरमे. टाटा प्रोजेक्ट लि., मे. चायना हार्बर इंजिनिअरिंग
पॅकेज १०गांधी नगर, नेवल हाऊसिंग, भांडुप महापालिका, भांडुप मेट्रो, शांघ्रीला, सोनापूरमे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि., मे. एएसटीएएलडीआय
पॅकेज ११मुलुंड फायर स्टेशन, मुलुंड नाका, तीन हात नाका, आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवाडामे. टाटा प्रोजेक्ट लि., मे. चायना हार्बर इंजिनिअरिंग
पॅकेज १२कापूर बावडी, मानपाडा, टिकू-जी-नि-वाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवलीमे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि., मे. एएसटीएएलडीआय


इतर विकासकामांनाही मंजुरी

मेट्रो कामांसोबतच या बैठकीमध्ये ठाणे, मिरा भाईंदर येथील विकासकामांनाही मंजुरी देण्यात आली. यामध्ये ४ किलोमीटर लांबीच्या ठाणे-बेलापूर रस्त्याचा समावेश असून त्याला २३७ कोटी रूपये खर्च येणार आहे. यामध्ये १.७ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचाही अंतर्भाव आहे. त्याशिवाय ठाणे-कोपरी रेल्वे ओलांडणी पूल(१२५ कोटी), छेडानगर उड्डाणपूल विकास(२२३ कोटी), मिरा-भाईंदर मूर्धा गाव ते उत्तन गाव रस्ता विकास (६१ कोटी) आणि घोडबंदर ते जैसल पार्क रस्ता विकास (५५ कोटी) या प्रकल्पांना यावेळी मान्यता देण्यात आली. त्यामुळे हे प्रकल्पही मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.हेही वाचा

मेट्रो-४ ची धाव आता गायमुखपर्यंत


संबंधित विषय