Advertisement

पंतप्रधान म्हणाले लाॅकडाऊन शेवटचा पर्याय, पण महाराष्ट्रात सध्या त्याचीच गरज- राजेश टोपे

भलेही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचं सांगितलं असलं, तरी महाराष्ट्रात सध्याच्या घडीला केवळ संचारबंदी पुरेशी नाही.

पंतप्रधान म्हणाले लाॅकडाऊन शेवटचा पर्याय, पण महाराष्ट्रात सध्या त्याचीच गरज- राजेश टोपे
SHARES

भलेही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचं सांगितलं असलं, तरी महाराष्ट्रात सध्याच्या घडीला केवळ संचारबंदी पुरेशी नाही. कोरोना संसर्गाची साखळी तोडायची असेल, तर अंशत: लाॅकडाऊन हा लावावाच लागेल, असं स्पष्ट मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी व्यक्त केलं.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकार लाॅकडाऊनच्या निर्णयावर ठाम असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की, राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली, तरी कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. पंतप्रधानांनी लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचं सांगितलं असलं, तरी महाराष्ट्रातील स्थिती इथंपर्यंत येऊन पोहोचली आहे. बेड्स, आॅक्सिजन, व्हेंटिलेटर्स, औषधं कमी पडू लागलीय हे आपल्याला ठाऊकच आहे. तब्बल ८० ते ९० टक्के आरोग्य सुविधा व्यापलेल्या आहेत. डाॅक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताणही वाढला आहे. त्यातच मृतांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडत आहे. 

हेही वाचा- शिवडी रुग्णालयातील डॉक्टरचा कोरोनामुळे मत्यू, शेवटची पोस्ट मन हेलावणारी

आपण जगातल्या इतर देशांकडे पाहिल्यास त्यांनी देखील लाॅकडाऊन लावून कोरोना (coronavirus) संक्रमणाची साखळी तोडण्यावरच भर दिलेला आहे. एका बाजूला संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जनसंपर्क कमी करायचा आणि दुसरीकडे आरोग्य यंत्रणा बळकट करायची, जास्तीत जास्त लसीकरण करायचं, असा पॅटर्न जगभरात वापरण्यात येत आहे. मंत्रिमंडळात यावर सखोल चर्चा होऊनच लाॅकडाऊन करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आलेला आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात (maharashtra) वर्षभरापूर्वी केवळ हजारांमध्ये असलेली बेड्सची संख्या आता लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रातच होत आहेत. सर्व अत्याधुनिक सामुग्री आपण उभी केली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था देखील बळकट करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील. परंतु त्यासाठी आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्याची अत्यांतिक गरज आहे.

त्यामुळे लाॅकडाऊनची नियमावली लवकरच जाहीर करण्यात येईल. यामध्ये सुरक्षित वावरासंदर्भातील नियम अधिक कडक केले जातील. जिल्हाबंदी केली जाईल. परंतु रेल्वे, बस सेला बंद राहणार नाही, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. 

(lockdown is needful in maharashtra state to control covid 19 disease spread says maharashtra health minister rajesh tope)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा