Advertisement

सीरमनं वाढवली कोविशिल्ड लसीची किंमत, आता 'या' किंमतीत लस उपलब्ध

कोविशिल्ड पुरवणाऱ्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियानं लसीचे दर निश्चित केले आहेत.

सीरमनं वाढवली कोविशिल्ड लसीची किंमत, आता 'या' किंमतीत लस उपलब्ध
SHARES

भारत मध्ये कोरोना विषाणूचा धोका वाढला आहे. हे पाहता कोरोनाशी लढा देणाऱ्या कोविशिल्डची लसीकरण मोहीम देखील जोरात सुरू आहे. नुकतंच १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना देखील कोरोना लस देण्यात येणार आहे. पण कोविशिल्ड पुरवणाऱ्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियानं लसीचे दर निश्चित केले आहेत.

सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियानं दिलेल्या नव्या निवेदनानुसार, सरकारी रुग्णालयात कोविशिल्ड लस ४०० रुपयात मिळणार आहे. तर खाजगी रुग्णालयांमध्ये ही लस ६०० रुपयात उपलब्ध होईल. यापूर्वी या लसची किंमत सरकारी रुग्णालयात २५० इतकी होती.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने पुढे म्हटलं आहे की, कंपनी एकूण लस उत्पादनापैकी ५०% भारत सरकार लसीकरण कार्यक्रमास देईल. उर्वरित ५०% लस राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांसाठी असेल. आतापर्यंत फक्त भारत सरकार ही लस विकत घेत होती, परंतु आता राज्य सरकार देखील ही लस खरेदी करण्यास सक्षम असेल.

सीरमनं असा दावा केला आहे की त्याच्या लसीची किंमत इतर विदेशी लसींच्या किंमतीपेक्षा कमी आहे. इतर लसींची किंमतही त्यांनी सांगितली आहे.

  • अमेरिकन लस किंमत : प्रति डोस १५०० रुपये
  • रशियन लस किंमत : प्रति डोस ७५० रुपये
  • चिनी लस किंमत : प्रति डोस ७५० रुपये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १ मेपासून देशभरात कोरोना लसीकरणाची तिसरी फेरी सुरू होणार आहे. ज्यामध्ये तरुणांनाही लस देण्यात येईल. आतापर्यंत केवळ ४५ वर्षापेक्षा जास्त वयाचे लसीकरण केलं जात होतं. मात्र, दिल्ली, पंजाब आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनीही तरुणांना लसीकरणाची मागणी केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वोच्च डॉक्टरांसोबत चर्चा करून घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील अधिकाधिक भारतीयांना कमीत कमी वेळेत लस दिली जावी यासाठी सरकार गेल्या एक वर्षापासून प्रयत्न करीत आहे.

या बैठकीत देशांतर्गत कंपन्यांना अधिक लस तयार करण्यास प्रवृत्त करण्याचे सांगितले गेले. याशिवाय इतर भारतीय आणि विदेशी लसांनाही मान्यता देण्याची चर्चा आहे.


हेही वाचा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा