Advertisement

शिवडी रुग्णालयातील डॉक्टरचा कोरोनामुळे मत्यू, शेवटची पोस्ट मन हेलावणारी

फेसबुकवर टाकण्यात आलेली पोस्ट मन हेलावून टाकणारी आहे.

शिवडी रुग्णालयातील डॉक्टरचा कोरोनामुळे मत्यू, शेवटची पोस्ट मन हेलावणारी
SHARES

शिवडी टीबी रूग्णालयाच्या ५१ वर्षीय डॉक्टराचं सोमवारी निधन झालं. निधनाच्या ३६ तासांपूर्वी डॉक्टरनं फेसबुकवर व्हिडिओ शेअर केला होता. डॉक्टर मनिषा जाधव असं तिचं नाव आहे. फेसबुकवर टाकण्यात आलेली पोस्ट मन हेलावून टाकणारी आहे.

शिवडी क्षयरोग रुग्णालयाच्या सीएमओ डॉ. मनिषा जाधव यांचा कोव्हिडमुळे मृत्यू झाल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.

शिवडीतील क्षयरोग रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा जाधव यांना मागील काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांना कांदिवलीतील शताब्दी अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी त्यांचे निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या.

उपचार सुरू असतानाच मनीषा यांनी फेसबुकवर गुड मॉर्निंगची पोस्ट टाकली होती. त्यांनी लिहिलं की, "हा माझा शेवटचा गुड मॉर्निंग असू शकेल. या प्लॅटफॉर्मवर मी तुला इथे भेटू शकणार नाही. काळजी घ्या. शरीर मरते. आत्मा नाही. आत्मा अमर आहे."

या पोस्टनंतर जवळपास ३६ तासानंतर सोमवारी १९ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या पोस्टमधून त्यांनी मृत्यूची पुसटशी कल्पना दिली होती.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, गेल्या मार्चपासून राज्यात जवळपास १८ हजार डॉक्टरांना कोविड झाला आहे. त्यापैकी १६८ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु काहींना पुरेशी भरपाई मिळाली नाही.



हेही वाचा

मुंबईतील मशिदी कोरोना रुग्णांना पुरवत आहेत मोफत ऑक्सिजन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा