मोटरमनने वाचवले शेकडो लोकांचे प्राण!

  Mumbai
  मोटरमनने वाचवले शेकडो लोकांचे प्राण!
  मुंबई  -  

  कळंबोली - मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे पुणे-सांतरागाछी एक्स्प्रेसला होणारा भीषण अपघात टळला. सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास पुणे सांतरागाछी गाडी लोखंडी तुकड्याला घासून जात असल्याची बाब मोटरमनच्या लक्षात आली आणि त्याने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान खाली अडकलेला लोखंडी तुकडा काढल्यानंतर ही गाडी पुन्हा मार्गस्थ झाली. या प्रकरणी प्रवाशांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

  दरम्यान, काही दिवसांपूर्वी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या मार्गावरही अशाप्रकारे लोखंडी तुकडा टाकलेला आढळून आला होता. मात्र, मोटरमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अपघात टळला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा असा प्रकार उघडकीस आल्यामुळे रेल्वे मार्गांच्या आणि त्यावरून धावणाऱ्या गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.