Advertisement

मुंबई शहर जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

मुंबई शहर जिल्ह्यासाठी निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणुकीसाठी ५ केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली करण्यात आली आहे.

मुंबई शहर जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
SHARES

मुंबई शहर जिल्ह्यासाठी निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणुकीसाठी ५ केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली करण्यात आली आहे. तसंच लवकरच ते मतदार संघात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.


पाच जणांची नियुक्ती

सर्वसामान्य केंद्रीय निरीक्षक म्हणून संजय प्रसाद आणि शिल्पा गुप्ता, पोलीस खात्यासाठी दीपक पुरोहित तसंच निवडणूक खर्चाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून अभिषेक शर्मा व संतोष कुमार करनानी यांची नियुक्ती केंद्रशासनातर्फे करण्यात आली आहे. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी संजय प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली असून ते १९९५ च्या बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे आय.ए.एस. अधिकारी आहेत. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी शिल्पा गुप्ता यांची नियुक्ती झाली असून त्या मध्यप्रदेश कॅडरच्या २००८ च्या बॅचच्या आय.ए.एस. अधिकारी आहेत.

भारतीय पोलीस सेवेतील दीपक पुरोहित हे २००७ चे राजस्थान मध्ये आय.पी.एस. अधिकारी असून त्यांच्याकडे मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण लोकसभा या दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी आहे. तसंच भारतीय महसूल सेवेचे २००५ चे राजस्थान कॅडरचे संतोष कुमार करनानी यांच्याकडे मुंबई दक्षिणची जबबादारी असून भारतीय रक्षा लेखा सेवेच्या २००४ चे राजस्थान कॅडरचे अभिषेक शर्मा यांच्याकडे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.




हेही वाचा -

कोस्टल रोडचं काम सुरूच राहणार; स्थगितीस न्यायालयाचा नकार

लोकसभा निवडणूक मतदानादिवशी सुट्टी जाहीर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा