Advertisement

कोस्टल रोडचं काम सुरूच राहणार; स्थगितीस न्यायालयाचा नकार

मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी कोस्टल रोडच्या कामाला स्थगिती देण्यास नकार दिला. कोस्टल रोडच्या कामाला स्थगिती देण्यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती.

कोस्टल रोडचं काम सुरूच राहणार; स्थगितीस न्यायालयाचा नकार
SHARES

मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी कोस्टल रोडच्या कामाला स्थगिती देण्यास नकार दिला. कोस्टल रोडच्या कामाला स्थगिती देण्यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान कोस्टल रोडच्या स्थगितीला नकार दिला.


महापालिकेला दिलासा

कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर आता कोस्टल रोडचं काम पुन्हा सुरू होणार असून महापालिकेला दिलासा मिळाला आहे. मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी कोस्टल रोडचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. कोस्टल रोड २९.२ किमी लांबीचा असून हा प्रकल्प महापालिका आणि राज्य सरकार एकत्ररित्या उभारणार आहे. या कोस्टल रोडला वरळी-कोळीवाडा नाखवा आणि वरळी मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटीनं न्यायालयात आव्हान दिले आहे.


जैवविविधतेची काळजी घेणार

याचिकाकर्त्यांनी प्रियदर्शनी पार्क ते वरळी-कोळीवाडा या प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्याला महापालिका आणि राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयात विरोध केला. सीआरझेड-१ या अतिसंवेदनशील भागात या रोडच्या बांधकामास परवानगी मिळाली असून जैवविविधतेची कमीतकमी हानी होईल, अशा पद्धतीनं काम करण्यात येणार असल्याचं सरकारी वकील मिलिंद साठे यांनी न्यायालयासमोर सांगितलं. याप्रकरणी आता पुढील सुनावणी ९ एप्रिल रोजी होणार आहे.


दिवसाला ११ कोटींचं नुकसान

याचिकाकर्त्यांनी या प्रकल्पाचं काम सुरू झाल्यास कोळीबांधवांना मासेमारी करता येणार नाही, तसंच त्या ठिकाणच्या जैवविविधतेला धोका निर्माण होईल, असा दावा करत प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यावेळी महापालिकेचे वकील अनिल साखळे यांनी हे काम थांबल्यास दिवसाला ११ कोटी रूपायांच नुकसान सोसावं लागणार असल्याची बाब न्यायलयाच्या निदर्शनास आणून दिली.




हेही वाचा -

मुंबईतील पायाभूत सोईंसाठी २.७५ लाख कोटी रुपये

राज्यात वीज दरवाढ होणार; वीज नियामक आयोगाची परवानगी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा