Advertisement

राज्यात वीज दरवाढ होणार; वीज नियामक आयोगाची परवानगी

१ एप्रिलपासून राज्यात वीज निर्मिती कंपन्या दरवाढ करण्याच्या विचारात आहेत. तसंच याला आता राज्य वीज नियामक आयोगानंही परवानगी दिल्यामुळं दरवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात वीज दरवाढ होणार; वीज नियामक आयोगाची परवानगी
SHARES

वीज निर्मिती कंपन्या १ एप्रिलपासून राज्यात दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. राज्य वीज नियामक आयोगानंही परवानगी दिल्यामुळं दरवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे.  १२ सप्टेंबर २०१८ च्या निर्णयानुसार महावितरण, टाटा पॉवर आणि अदानी या कंपन्यांना घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांकडून ८ हजार २६८ कोटींची वसुली करण्यासाठी दरवाढीची परवानगी देण्यात आली आहे.


१ तारखेपासून नवे दर

१ एप्रिलपासून निर्णयानुसार महावितरण, टाटा पॉवर आणि अदानी या कंपन्यांना घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांकडून नव्या दरानुसार बिलाची आकारणी करण्यात येणार आहे. अदानी कंपनीतर्फे केवळ मुंबई उपनगरात वीज पुरवठा करण्यात येतो. अदानीच्या ग्राहकांना पहिल्या १०० युनिटसाठी प्रति युनिट २७ पैसे, १०१–३०० युनिटसाठी प्रति युनिट २६ पैसे, तर ३०१–५०० युनिटसाठी प्रति युनिट २१ पसे अतिरिक्त मोजावे लागणार आहेत.

महावितरणच्या ग्राहकांना आता पहिल्या १०० युनिटसाठी १६ पैसे प्रति युनिट, १०१-३०० युनिटसाठी २४ पैसे तर ३०१-५०० युनिटसाठी प्रति युनिट १५ पैसे दरवाढ सहन करावी  लागणार आहे.




हेही वाचा -

सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी २ महिने बंद

कुलाब्यातली झपाटलेली 'मुकेश मिल' शुटींगसाठी होणार बंद



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा