Advertisement

निवडणूक आयोगाचा ढिसाळ कारभार; कर्मचाऱ्यांना नाहक त्रास

सोमवारी मुंबईतील ६ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. नेहमीप्रमाणेचा महापालिका कर्मचारी, सरकारी कर्मचारी यांना मतदान केंद्रांवर ड्युटी लावण्यात आली होती. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी ठेवण्यात आली होती. मतदान संपल्यानंतर सर्व काम पूर्ण झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांना ३ ते ४ नाहक तात्कळत राहावं लागल्याचं चित्र सोमवारी पहायला मिळलं.

निवडणूक आयोगाचा ढिसाळ कारभार; कर्मचाऱ्यांना नाहक त्रास
SHARES

सोमवारी मुंबईतील ६ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. नेहमीप्रमाणेचा महापालिका कर्मचारी, सरकारी कर्मचारी यांना मतदान केंद्रांवर ड्युटी लावण्यात आली होती. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी ठेवण्यात आली होती. मतदान संपल्यानंतर सर्व काम पूर्ण झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांना ३ ते ४ तास नाहक तात्कळत राहावं लागल्याचं चित्र सोमवारी पहायला मिळलं. मतदान यंत्र बंद केल्यानंतर बराच वेळ महिला कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना यंत्र गोळा होण्याची वाट पहावी लागली. यानंतर अनेक महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या संघटनांकडे तक्रार नोंदवल्याची माहितीही समोर आली आहे. रात्री साडेनऊ वाजल्यानंतरही मतदान यंत्र गोळा करण्यासाठी गाड्या आल्या नव्हता. त्यामुळं निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभाराचा नाहक त्रास सर्वांना झाल्याची प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी दिली.


मतदानापूर्वीही पूर्ण दिवस काम

मतदानाच्या आदल्या दिवशीही कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र आणण्याची आणि मतदानापूर्वीच्या कामांसाठी ड्युटी लावण्यात आली होती. त्यादिवशीही बराच कालावधी लोटला गेला असला तरी मतदान यंत्र घेऊन मतदान केंद्रांपर्यंत जाण्यासाठीही गाड्या वेळेत न आल्यानं त्रास सहन करावा लागला होता. त्या दिवशीही अनेक कर्मचाऱ्यांना सकाळी ७-८ वाजल्यापासून रात्री ७-८ वाजेपर्यंत काम करावं लागलं. त्यांनंतर सोमवारी मतदानाच्या दिवशी अनेक कर्मचाऱ्यांना सकाळी ४ वाजताच कामावर निघावं लागलं होतं. महापालिकेच्या शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश होता. त्यातच अनेक कर्मचाऱ्यांना आपलं घर गाठण्यासाठी रात्रीचे ११ वाजल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे शिक्षकांना दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी ७ वाजता आपल्या शाळेत कसं पोहोचायचं असा प्रश्न पडला होता. 


महिला कर्मचाऱ्याला त्रास

मुंबईतल्या एका मतदान केंद्रावर आणखी एक महिला कर्मचाऱ्यासाठी त्रासदायक प्रकार घडला. रात्री उशीरापर्यंत मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना थांबून राहावं लागल्यानं महिला कर्मचाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं. एक महिला कर्मचारी बाळांतपणाच्या रजेनंतर कामावर रूजू झाल्या होत्या. कामावर नसताना त्यांच्या नावानं निवडणुकीच्या ड्युटीची ऑर्डर आली होती. परंतु कामावर रूजू झाल्यानंतर ती त्यांना मिळाली. अशातच सोमवारी रात्री त्यांच्याबाबत घडलेला प्रकार सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणणारा होता. सदर महिला कर्मचारी आपल्या ६ महिन्याच्या बाळाला घरी ठेवून आपल्या कामावर रूजू झाल्या. परंतु रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या कामामुळं सदर महिला कर्मचाऱ्याला घरी जाता आलं नाही.


अडवणुकीचा प्रयत्न

आपलं बाळ ६ महिन्यांचं असून ते रडत असल्याचं सांगत त्यांनी घरी सोडण्याची विनवणी केली. परंतु त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या मुख्य कर्मचाऱ्यांनी त्यांना जाण्याची परवानगी दिली नाही. घरी जायचं असल्यास आपल्याला २ दिवसाचा कामाचा मोबदला दिला जाणार नसल्याचं सांगत त्यांची अडवणूक करण्याचाही प्रयत्न केला. परंतु अखेर एका महिला कर्मचाऱ्यांच्या मध्यस्तीनंतर सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना सोडण्यासाठी दबाव टाकला. त्यानंतर वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सदर महिलेला सोडण्यात आलं.

ही खऱ्या अर्थानं एका ठिकाणची गोष्ट झाली. अशा गोष्टी अन्य कुठे झाल्याचही नाकारता येत नाही. अनेकदा कर्मचारी आपल्यावर कारवाई होईल या भीतीनं गप्प बसल्याचं दिसून येतं. परंतु निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराचा नाहक त्रास कर्मचाऱ्यांना भोगावा लागतोय हे नाकारता येणार नाही.




हेही वाचा -

नेस वाडियाला जपानमध्ये २ वर्षांची शिक्षा, अंमल पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा