नेस वाडियाला जपानमध्ये २ वर्षांची शिक्षा, अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक

वाडिया समूहाचे वारस आणि आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांना जपानमध्ये अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल २ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

नेस वाडियाला जपानमध्ये २ वर्षांची शिक्षा, अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक
SHARES

वाडिया समूहाचे वारस आणि आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांना जपानमध्ये अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल २ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही शिक्षा सस्पेंड प्रकारातील आहे. म्हणजेच या काळात नेस वाडिया जपानमध्ये कुठलंही बेकायदा कृत्य करताना आढळल्यास त्यांना तुरूंगात टाकण्यात येईल.


सहलीसाठी जपानमध्ये

४७ वर्षांचे नेस वाडिया मार्च महिन्यात सहलीसाठी जपानमध्ये गेले होते. तेथील होक्काईको आयलँडच्या न्यू चिटोज विमानतळावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी केलेल्या चेकींगदरम्यान नेस यांच्याकडे २५ ग्रॅम गांजा आढळून आला. त्यांनी आपला गुन्हा कबुल केल्यानंतर स्थानिक तपास अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं.


जामिनावर सुटले

नेस २० मार्चपर्यंत जपान पोलिसांच्या ताब्यात होते. त्यानंतर जामिनावर सुटून ते भारतात परतले. त्यांना जपान कोर्टाने ५ वर्षांची सस्पेंड शिक्षा ठोठावली आहे. या काळात नेस जपानमध्ये कुठलंही बेकायदा कृत्य करताना आढळल्यास त्यांना तुरूंगात टाकण्यात येईल. जपानच्या टोक्यो शहरात २०२० मध्ये आॅलिम्पिक स्पर्धा होणार आहे. तर चालू वर्षांत रग्बी वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे जपानमध्ये अंमलपदार्थ विरोधी कायदा कडक करण्यात आला आहे.


शेअर्स घसरले

नस्ली वाडिया यांचे सर्वात मोठे चिरंजीव असलेले नेस हे २८३ वर्षांची परंपरा असलेल्या वाडिया समूहाच्या कुटुंबातील महत्त्वाचे सदस्य आहेत. फोर्ब्जच्या माहितीनुसार वाडिया समूहाकडे ब्रिटानिया इंडस्ट्रीजपासून गो एअर वेजची मालकी आहे. या कंपन्यांचं मूल्य १३.१ अब्ज डाॅलर (९७,७०० कोटी रुपये) इतकं असून नस्ली वाडिया यांच्याकडे ७ बिलियन डाॅलर (४९,०००) कोटी रुपये संपत्ती आहे. त्यांच्या अटकेच्या बातमीमुळे वाडिया समूहातील कंपन्यांचे समभाग काही प्रमाणात कोसळले. बॉम्बे डाईंगचे समभाग १७.३ टक्क्यांनी, तर बॉम्बे बर्माचे समभाग ६ टक्क्यांनी घसरले.



हेही वाचा-

भाजप नगरसेवकाचा मनसेच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

गोरेगावमधील कामा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा