Advertisement

गोरेगावमधील कामा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग

गोरेगाव येथील कामा इंडस्ट्रीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला ही आग लागल्याची माहिती मिळते आहे.

गोरेगावमधील कामा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग
SHARES

गोरेगाव येथील कामा इंडस्ट्रीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला ही आग लागल्याची माहिती मिळते आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलम नाही. अग्निशमन दलाच्या १२ हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अखेर ५ तासांनतर आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाला यश आलं.  


साहित्य जळून खाक

दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला ही आग लागल्याची माहिती समोर येत अाहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र गोदामातील साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झालं आहे. आगीचं कारण अस्पष्ट असून घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.


बिग बाझारला आग

दरम्यान, माटुंगा येथील बिग बाझारला सोमवारी संध्याकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास भिषण आग लागली होती. या आगीत बिग बाझारमधील सामान मोठ्या प्रमाणात जळून खाक झालं.हेही वाचा -

माटुंग्यातील बिग बझारला भीषण आग

म्हणून राज ठाकरे भडकले, पावणे दोन तासाने लागला मतदानासाठी नंबरRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा