पालिका कार्यालयाचा बनवलाय भाजीबाजार

मुलुंड - मुलुंड येथे पालिकेच्या जनगणना कार्यालयातील सरकारी कर्मचारी भाज्या निवडताना कॅमेऱ्यात कैद झालेत. विशेष म्हणजे घरची कामं बिनधास्तपणे ऑफिसच्या टेबलावर आणि कामाच्या वेळेत करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कुणाचीच भिती नाही. चंदन सोनटक्के हे सासऱ्यांचं डेथ सर्टीफिकेट घेण्यासाठी वांद्र्याहून मुलुंडच्या टी वॉर्ड ऑफिसमध्ये खेटे मारून थकलेत. मात्र जेव्हा काम न होण्याचं कारण त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना हा प्रकार दिसला आणि त्यांनी सर्व प्रकार मोबाईमध्ये शूट केला.

Loading Comments