Advertisement

कांदिवली, दहिसरमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा

दहिसरमध्ये पाणीपुरवठ्यावर अधिक परिणाम होणार आहे.

कांदिवली, दहिसरमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा
SHARES

मंगळवारी कांदिवली (Kandivali) ते दहिसर (Dahisar) परिसराला कमी दाबाने पाणीपुरवठा (water supply) होणार आहे. अशा स्थितीत मंगळवारी या भागातील रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. दहिसरच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे. तसेच पुढील दोन दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे.

बोरिवली (पूर्व) येथील संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील बोरिवली ( हिल जलाशय क्रमांक 2 ची संरचनात्मक तपासणी मंगळवार, 9 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1 ते रात्री 9 (एकूण आठ तास) केली जाईल. या कामादरम्यान बोरिवली हिल जलाशय क्रमांक 2 रिकामा करण्यात येणार आहे.

त्यामुळे कांदिवली, बोरिवली आणि दहिसर या पालिकेच्या आर/दक्षिण, आर/मध्य आणि आर/उत्तर विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. पुढील दोन दिवस पाणी गढूळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी पिण्यापूर्वी गाळून आणि उकळून घ्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.



हेही वाचा

आशा स्वयंसेविका राज्यव्यापी बेमुदत संपावर जाण्याची शक्यता

ठाणे महापालिकेच्या उद्यानांमधील झाडांवर आता QR कोड

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा