Advertisement

LPG गॅसच्या किंमतीत १०५ रुपयांनी वाढ

या युद्धाचा थेट फटका आता सर्वसामान्यांना बसणार आहे.

LPG गॅसच्या किंमतीत १०५ रुपयांनी वाढ
SHARES

रशिया-यूक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळं जगाच्या राजकारणालाच नाही तर अर्थकारणालाही फटका बसला आहे. या युद्धामुळं पेट्रोलियम पदार्थांच्या दरात वाढ होताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या युद्धाचा थेट फटका आता सर्वसामान्यांना बसणार आहे. याच कारण म्हणजे LPG गॅस पुन्हा महागला आहे. सिलेंडरच्या दरात १०५ रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी करण्यात आली आहे.

१ मार्च रोजी एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, ५ राज्यांच्या निवडणुका सुरू असल्यानं घरगुती सिलेंडरच्या दरात ७ मार्चनंतर वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदान ३ मार्च आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान ७ मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे ७ मार्चनंतर घरगुती गॅस सिलेंडरसाठी तुमच्या खिशातून अधिकचा खर्च सहन करावा लागू शकतो.

या दरवाढीनंतर मंगळवारपासून १९ किलो व्यावसायिक सिलेंडरची किंमत २,०१२ रुपये इतकी होणार आहे. तर ५ किलो सिलेंडरची किंमत २७ रुपयांनी वाढणार आहे. आता दिल्लीत ५ किलो सिलेंडरसाठी ५६९ रुपये मोजावे लागतील. तर मुंबईत १९ किलोसाठी १ हजार ९६३ रुपये द्यावे लागतील.

सध्या देशात ५ राज्याच्या निवडणुका असल्यानं मागील काही महिने विना अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत जास्त फरक झाला नाही. कच्च्या तेलाचे दर १०२ डॉलर प्रति बॅरेल झाल्यानंतरही ऑक्टोबर २०२१ पासून घरगुती सिलेंडरच्या दरात फारसा बदल झालेला नाही. त्यामुळं निवडणुकीनंतर म्हणजे ७ मार्च मतदानाचा अखेरचा टप्पा झाल्यानंतर कधीही घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात १०० ते २०० रुपये प्रति सिलेंडर वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा